Groom Kicks Bride During Selfie Dispute At Wedding Stage Saam Tv
देश विदेश

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Groom Kicks Bride During Selfie Dispute At Wedding Stage: लग्न समारंभात सेल्फीच्या वादातून नवरदेवाने नवरीला लाथ मारत सासऱ्यालाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेश येथील बाराबाकी या गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामनगर परिसरात लग्नाचा आनंदाचा सोहळा सुरू असताना कार्यक्रमादरम्यान स्टेजवर सेल्फी घेण्याच्या वादातून मोठा गोंधळ उडाला. सेल्फीवरून संतापलेल्या नवरदेवाने स्टेजवरच नवरीला लाथ मारल्याची आणि सासऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. लाठी-काठ्यांनी एकमेकांना मारहाण करत खुर्च्याही एकमेकांच्या अंगावर फेकल्या गेल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या मारहाणीत दोन्ही बाजूंचे पाच जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न (व्यवसाय – मूर्तिकार) यांनी आपल्या मुलगी निशाची लग्नगाठ विशालसोबत बांधण्याचे ठरवले होते. शुक्रवारी रात्री वरात मोठी वाजत गाजत पोहोचली आणि नवरदेव आणि नवरी स्टेजवर आले. फोटो आणि सेल्फीसाठी मोठी गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्टेजवरच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. वारंवार चेहरा पुसत असलेला नवरदेव विशाल गर्दी हटवण्याचा प्रयत्न करत होता आणि सेल्फी घेण्यास नकार करत होता, मात्र कोणी ऐकले नाही.

याच दरम्यान विशालचा संयम सुटला आणि त्याने संतापात नवरीलाच लाथ मारली. या प्रकारामुळे वातावरण तापले आणि दोन्ही बाजूंमध्ये मारहाण सुरू झाली. लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे व्यथित झालेल्या नवरदेवाने सुरुवातीला लग्नास नकार दिला. मुलीच्या कुटुंबीयांनी नवरदेव नशेत असल्याचा आरोप केला. मात्र उशिरा रात्री दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली. नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी केल्यानंतर उर्वरित विधी पार पडले आणि मुलीला सासरी पाठवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GAIL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार १.८० लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा कडुलिंबाची पेस्ट, करुन बघा घरगुती उपाय

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

SCROLL FOR NEXT