Greg Biffle family killed in plane crash 
देश विदेश

Plane Crash : खासगी विमानाचा भयंकर अपघात, दिग्गज खेळाडूसह अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, कशी घडली दुर्घटना?

Greg Biffle family killed in plane crash : अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये खासगी सेस्ना C550 विमानाचा अपघात होऊन निवृत्त NASCAR चालक ग्रेग बिफल, त्यांची पत्नी, मुले आणि मित्रांचा मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

Greg Biffle family killed in plane crash : अमेरिकेतली उत्तर कॅरोलिनामध्ये एका खासगी विमानाचा अपघात झाला. यामध्ये दिग्गज रेसलरसह अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू झाला. टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणातच हे खासगी विमान कोसळले. या भीषण अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये निवृत्त NASCAR चालक ग्रेग बिफल, त्यांची पत्नी क्रिस्टीना आणि मुले रायडर (५) आणि एम्मा (१४) यांचा समावेश आहे.

उत्तर कॅरोलिनातील स्टेट्सविले विमानतळाजवळ C550 या खासगी विमानाचा गुरुवारी सकाळी अपघात झाला. टेकऑफ केल्यानंतर परतण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळीच जमिनीवर कोसळले आणि आगीचा भडका उडाला. त्यामध्ये अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला.

अपघाताच्या वेळी हवामान रिमझिम आणि ढगाळ होते. हे जेट ग्रेग बिफल यांच्या कंपनीकडे नोंदणीकृत होते. तथापि, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या अपघातामुळे संपूर्ण रेसिंग जगतावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, सेस्ना C550 हे जगभरात वापरले जाणारे एक लोकप्रिय मध्यम आकाराचे बिझनेस जेट होते.

विमानात कोण कोण होते?

ग्रेग बिफल (५५), पत्नी क्रिस्टीना आणि मुले रायडर आणि एम्मा

डेनिस डटन आणि त्याचा मुलगा जॅक

बिफलचा जवळचा मित्र क्रेग वॅड्सवर्थ

अपघात कसा झाला ?

सेस्ना सी५५० या खासगी विमानाने ग्रेग बिफल सकाळी १० वाजता स्टेट्सविले विमानतळावरून फ्लोरिडासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण घेतले पण काही क्षणात पायलटला समस्या लक्षात आली. त्याने तात्काळ विमानतळावर परत येण्याचा प्रयत्न केला. पण पायलटचे नियंत्रण सुटले अन् विमान कोसळले. जोरात धडक झाल्यामुळे विमानाने पेट घेतला अन् आग भडकली. यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. ग्रेग बिफल हे पत्नी क्रिस्टीना, पाच वर्षांचा मुलगा रायडर आणि १४ वर्षांची मुलगी एम्मा यांच्यासह विमानात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

SCROLL FOR NEXT