Bhagat Singh Koshyari Latest News
Bhagat Singh Koshyari Latest News  Saam TV
देश विदेश

Governer Resign : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, देशातील 12 राज्यांमध्ये मोठे फेरबदल

वृत्तसंस्था

12 states Governer Change : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. कोश्यारींसोबतच लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. याशिवाय 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रपतींनी मोठे बदल केले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांची आसामचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपालांची यादी

लक्ष्मण प्रसाद आचार्य - सिक्किम

शिव प्रताप शुक्ला -हिमाचल

गुलाब चंद्र कटारिया -असाम

बीडी मिश्रा - लद्दाख

रमेश बैस - महाराष्ट्र

अब्दुल नजीर - आंध्र प्रदेश

एल. गणेशन - नागालैंड

सीपी राधाकृष्णन - झारखंड

बिस्वास भूषण हरिचंदन - छत्तीसगढ

लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक - अरुणाचल प्रदेश

अनुसुईया उईके - मणिपूर

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर - बिहार

राज्यपालांची नेमणूक कशी होते?

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते. राष्ट्रपती पदासाठी पात्रता म्हणून ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करु शकतात. शिवाय राज्यपालाला पदावरुनही हटवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT