Investment  Canva
देश विदेश

Investment Schemes : सर्वसामान्यांना नववर्षाची सरकारकडून भेट! स्मॉल सेव्हिंग स्कीम्सच्या व्याजदरात वाढ

PPF, सुकन्या समृद्धी योजनेवर देऊ केलेल्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

प्रविण वाकचौरे

नवी दिल्ली : सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस ठेव योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

वित्त मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीसाठी या बचत योजनांवरील व्याजदरात २० ते ११० बेस पॉईंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर PPF, सुकन्या समृद्धी योजनेवर देऊ केलेल्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (Latest Marathi News)

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी वाढलेले दर १ जानेवारी २०२३ पासून लागू होतील. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात NSCवरील व्याज वाढवून ७ टक्के करण्यात आले आहे. जे आधी ६.८ टक्के होते. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याज आठ टक्के करण्यात आले आहे. सध्या त्यावर ७.६ टक्के व्याज मिळत आहे.

सरकारने केलेली ही वाढ नुकत्याच करण्यात आलेल्या व्याजदराच्या अनुषंगाने आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर बदललेले नाहीत. पोस्ट ऑफिसच्या एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढणार आहेत. मासिक उत्पन्न योजनेत ६.७ टक्क्यांऐवजी आता ७.१ टक्के व्याज मिळणार आहे.

केंद्र सरकार अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा तिमाही आधारावर आढावा घेते. श्यामला गोपीनाथ समितीने छोट्या बजेटच्या योजनांसाठी व्याजदर मोजण्याचे सूत्र दिले होते. समितीच्या शिफारशींनुसार, विविध योजनांचे व्याजदर 25 ते 100 बीपीएस जास्त असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT