Petrol Diesel Price Today Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price : खुशखबर! पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होणार?, कच्चा तेलाचे दर प्रचंड घसरले

Petrol Diesel Rate : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे.

Satish Daud

Petrol Diesel Price News : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल वाढत्या किंमतीमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. दर दोन दिवसाला पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असल्याने आर्थिक बजेट कोलमडत आहे. मात्र, आता यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

कारण, जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. अमेरिकन ऑइल डब्ल्यूटीआयच्या किंमतीत 5.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. किंमत प्रति बॅरल $3.63 ने कमी होऊन प्रति बॅरल $67.70 वर आली आहे. दोन्ही कच्च्या तेलाच्या किमतींचा दर हा डिसेंबर 2021 च्या खालच्या पातळीवर आला आहे.

याचा परिणाम भारतीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. किंमत 346 रुपयांनी कमी होऊन 5,637 रुपये प्रति बॅरलवर आली आहे. ट्रेडिंग सत्रात कच्च्या तेलाचा भाव 5,617 रुपयांवर गेला होता. बाजार सुरु होताना हा दर 5,968 रुपयांवर होता. (Maharashtra Breaking News)

क्रूड ऑईलचे दर 5,500 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे भारतात पेट्रोल डिझेल तब्बल १५ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या वाहनधारकांना हा मोठा दिलासा असेल.

आजचा पेट्रोल डिझेलचा भाव काय?

दरम्यान, कच्चा तेलाचे भाव कमी होताच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलचे (Petrol)आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतपेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा (Diesel) दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT