Edible Oil Price Latest News: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत खाद्यतेल मिळावे यासाठी त्यावरील मूलभूत आयात शुल्क कमी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गुरूवारी याबाबतचा आदेश काढला आहे. (Latest Marathi News)
गेल्या काही दिवसांपासून महागाईत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहेत. त्यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे.
सरकारने सोयाबीन तेल (Edible Oil Price) आणि सूर्यफूल तेल यावरील मूलभूत आयात शुल्क गुरुवारपासून १७.५ टक्क्यांवरून कमी करून १२.५ टक्के केले आहे. सुधारित आयात शुल्क ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत.
मूलभूत आयात शुल्क हा खाद्यतेलांच्या किमतीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असतो. त्याचा परिणाम देशांतर्गत किमतींवर होतो. रिफाईन्ड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे.
यामुळे खाद्यतेलांच्या देशांतर्गत किरकोळ विक्री किमती घटण्यास मदत होईल. रिफाईन्ड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क ऑक्टोबर २०२१ मध्ये ३२.५ टक्क्यांवरून कमी करून १७.५ टक्के करण्यात आले होते. खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती २०२१ मध्ये खूप जास्त होत्या आणि देशांतर्गत किमतीवरही त्याचे परिणाम होत होते.
दरम्यान, भारताची पामतेल आयात मे महिन्यात १४.५९ टक्क्याने कमी होऊन ४ लाख ३९ हजार १७३ टनांवर आली आहे. याचवेळी कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे आहे, अशी माहिती सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसईए) गुरूवारी दिली. मागील वर्षी मे महिन्यात पामतेलाची ५ लाख १४ हजार २२ टन आयात झाली होती.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.