Agniveer Recruitment 2026 saam tv
देश विदेश

Agniveer Recruitment 2026: अग्निवीर होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, २५००० पेक्षा अधिक पदांसाठी भरती; कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Indian Army Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य दलाकडून अग्निवीर भरती २०२६ ची अधिकृत घोषणा केली असून तब्बल २५००० पेक्षा जास्त पदं भरली जाणार आहेत. कुठे अन् कसा अर्ज भरायचा हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली

  • देशभरात २५,००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार

  • अर्ज प्रक्रिया १३ फेब्रुवारी ते १ एप्रिल २०२६ दरम्यान सुरू राहणार

  • परीक्षा १ जून ते १५ जून २०२६ दरम्यान होणार

देशसेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. भारतीय सैन्य दलाने २०२६ च्या अग्निवीर भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन देशाचे रक्षण करण्याचे आणि वर्दी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. अग्निवीर होऊन त्यांना देशाची सेवा करता येणार आहे. तब्बल २५००० पेक्षा जास्त पदासांठी बंपर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत जनरल ड्यूटी, ट्रेड्समन, क्लर्क, टेक्निकल आणि इतर पदं भरली जाणार आहेत.

अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२६ आहे. अर्ज करण्यासाठी बरेच दिवस शिल्लक असले तरी तरुणांनी लवकर अर्ज करावेत. तुमची ऑनलाइन कॉमन एक्ट्रन्स एक्झाम (सीईई) १ जून २०२६ ते १५ जून २०२६ दरम्यान होणार आहे. सर्व श्रेणीतील उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. हे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने द्यावे लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल.

१० वी उत्तीर्ण -

जर तुम्ही जनरल ड्यूटीसाठी अर्ज करत असाल, तर तुम्ही

किमान ४५ टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण मिळवलेले असावेत.

आठवी आणि बारावी उत्तीर्ण -

ट्रेड्समन आणि क्लर्क/टेक्निकल सारख्या पदांसाठी, आठवी आणि

बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. जर तुम्ही नुकतेच दहावी उत्तीर्ण झाले असाल आणि निकालाची वाट पाहत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पण तुम्हाला तुमची मूळ गुणपत्रिका रॅलीमध्ये सादर करावी लागेल.

वयोमर्यादा -

अग्निवीर होण्यासाठी तरुणांचे वय १७.५ ते २१ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचा जन्म १ जुलै २००५ ते १ जुलै २००९ दरम्यान झालेला असावा. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांनाही वयात ३० वर्षांची सूट देण्यात आली आहे.

शारिरीक चाचणी -

सैन्यात सहभागी होण्यासाठी फक्त शिक्षणच नाही तर शारीरिक तंदुरुस्ती देखील महत्वाची असते. तुमची उंची किमान १६२ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त, तुमची छाती किमान ५ सेंटीमीटर रुंद असावी आणि तुमचे वजन तुमच्या उंची आणि वयानुसार योग्य असावे. रॅली दरम्यान तुमची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) घेतली जाईल. यामध्ये १.६ किलोमीटरची रनिंगचा समावेश असेल. जर तुम्ही ही रनिंग ७ मिनिटे आणि ४५ सेकंदात पूर्ण केली तर तुम्हाला उत्कृष्ट गटात स्थान मिळेल. तुम्हाला १० फूट लांब उडी आणि ३ फूट उंच उडीसाठी देखील पात्रता मिळवावी लागेल.

निवड प्रक्रिया-

दोन टप्प्यात निवड प्रक्रिया होईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा होईल. दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची त्यांच्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. त्यानंतर त्यांना भरतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप, वैद्यकीय तपासणी आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

पगार -

अग्निवीर म्हणून निवड झालेल्या तरुणांना पहिल्या वर्षी दरमहा ३०,००० रुपये पगार मिळेल. दुसऱ्या वर्षी हा पगार ३३,००० रुपये, तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये आणि चौथ्या वर्षी दरमहा ४०,००० रुपयांपर्यंत वाढेल. याशिवाय तुम्हाला नियमांनुसार जोखीम आणि कष्ट भत्ता, रेशन, कपडे आणि प्रवास भत्ता मिळेल.

असा करा अर्ज?

अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in ला भेट द्या. जर तुम्ही नवीन युजर्स असाल, तर तुमची मूलभूत माहिती प्रविष्ट करून आणि लॉगिन आयडी तयार करून नोंदणी करा. लॉग इन केल्यानंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा, तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शेवटी २५० रुपये फी भरा. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होळीच्या तोंडावर आदिवासींचे मनरेगाचे पैसे थकले; यशोमती ठाकूर जोरदार टिकास्त्र

Gavar-Bhopla Bhaji Recipes : कोकण स्पेशल गवार-भोपळ्याची भाजी अन् गरमागरम तांदळाची भाकरी, रात्रीच्या जेवणाचा गावरान बेत

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Oily Skin Makeup Tip: ऑयली स्किनमुळे मेकअप लवकर खराब होतो? मग ट्राय करा ही सोपी मेकअप टिप

IND vs ENG Semi Final: इंग्लंडने जिंकला टॉस; टीम इंडियाविरूद्ध पहिल्यांदा करणार गोलंदाजी, पाहा भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT