Gold Hallmarking  Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Rates Today : सोनं वाढलं की दरात झाली घसरण? जाणून घ्या आजचा भाव

भारतीय सराफ बाजारात आज, सोने-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारतीय सराफ बाजारात आज, सोने-चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली. सोन्याच्या दर आज प्रति तोळा ५६ हजार रुपये पार गेला आहे. तर चांदीचा भाव ६४ हजार रुपयाहून अधिक प्रति किलो एवढा झाला आहे. (Latest marathi News)

'इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन'च्या नुसार, शुक्रवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा (Gold) भाव ५६,१०३ रुपये प्रति तोळा झाला आहे. तर आज सकाळी ५६,१०८ रुपये इतका झाला होता. शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदीच्या (Silver) दरात उसळी पाहायला मिळत आहे.

सोने-चांदीचा आजचा भाव काय?

'ibjarates.com' वेबसाईटनुसार, सोमवारी सकाळी ९९५ शुद्धता असणारं सोन्याचा भाव ५५,८८३ रुपये इतका झाला आहे. तर ९१६ शुद्धता असणारं सोन्याचा भाव आज ५१, ३९५ रुपये इतके झाला आहे.

७५० शुद्धता असणारं सोन्याचा भाव ४२,०८१ रुपये इतका झाला आहे. तर ५८५ शुद्धता असणारं सोन्याचा भाव हा ३२८२३ रुपये इतका झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव आज ६४,२९३ रुपये इतका झाला आहे.

सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT