Gold Silver Price Hike Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Hike : सोनं महागलं! चांदीच्या दरातही वाढ; दागिने खरेदीसाठी किती पैसे जास्त मोजावे लागणार? पाहा नवे दर

Gold Silver Price In Maharashtra : आज आंतराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सतत वाढ व किंचिंत घटही पाहायला मिळाली. त्यामुळे वीकेंडला अनेक ग्राहकांचा कल हा सोनं खरेदी करण्याकडे होता. परंतु आज आंतराष्ट्रीय बाजाराच्या अनुषंगाने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली.

दिल्ली सराफा बाजारात (Market) सोन्याचा भाव 880 रुपयांनी तर चांदीचा भाव एक किलो मागे 700 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना खरेदांराच्या नाकी नऊ येणार की, काय ? हा प्रश्न पडतोय

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,640 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 761 रूपये आहे. (Gold Silver Price update 4 May 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 62,240 रुपये

दिल्ली - 61,790 रुपये

हैदराबाद - 61,640 रुपये

कोलकत्ता - 61,640 रुपये

लखनऊ - 61,790 रुपये

मुंबई - 61,640 रुपये

पुणे - 61,640 रुपये

नागपूर - 61,640 रुपये

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

3. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT