Gold Silver Price 6 April 2023  Saam TV
देश विदेश

Gold Price Today : हनुमान जयंतीच्या दिवशीच सोन्याने घेतली उंच उडी; चांदीचा भावही डोंगराएवढा, वाचा आजचे दर

Gold Silver Rate : आज हनुमान जयंतीच्या दिवशी सोने-चांदी दराने उच्चांक गाठला आहे. सराफा बाजार उघडताच, बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.

Satish Daud

Gold Silver Price : तुम्ही जर सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, ऐन लग्नसराईच्या हंगामात सोने-चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. आज हनुमान जयंतीच्या दिवशी सोने-चांदी दराने उच्चांक गाठला आहे. सराफा बाजार उघडताच, बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. या वाढीनंतर सोन्याने पुन्हा एकदा महागाईचा जुना विक्रम मोडून नवा विक्रम केला आहे. (Latest Marathi News)

 सोने-चांदी (Gold And Silver Price) दर हे जागतिक बाजारावर आधारभूत असतात. मागील काही दिवसांपासून जागतिक बाजारात सोने-चांदी दरात वाढ होत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे. मागील आठवडाभरापासून भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात सातत्याने वाढ होत आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

बुधवारी सराफा बाजारात  सोन्याच्या (Gold Price) दरात तब्बल १ हजार ०६६ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचा भाव प्रतितोळा ६० हजार ८८१ इतका झाला होता. गुरूवारी सुद्धा सोन्याच्या भावात तेजी आली. सराफा बाजार उघताच सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ६१ हजार ३३१ इतका झाला आहे.

आजचा चांदीचा भाव काय?

दुसरीकडे सोन्याबरोबर चांदीच्या (Silver Price) दरातही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सराफा बाजारात चांदीचा भाव २ हजार १३४ रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे १ किलो चांदीचा दर ७६ हजार ८३४ वर पोहचला होता. गुरूवारी चांदीच्या दरात घसरण होईल, असं अनेकांना वाटत होतं. मात्र, सराफा बाजार उघताच चांदीचे दरही झपाट्याने वर गेले. आज सराफा बाजारात १ किलो चांदीचा दर ७७ हजार ९० इतका आहे.

सोने-चांदी दर वाढण्याची कारणं काय?

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरमधील कमजोरी, कमकुवत यूएस डेटा, यूएस फेडद्वारे व्याजदरात वाढ, आर्थिक अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. या ५ कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर वाढत आहेत. भारतात, सोन्याला ५९,५०० च्या जवळ मजबूत आधार मिळाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या धातूला २,०१० डॉलर इतका मजबूत आधार मिळाला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दराला 23 डॉलर प्रति औंसच्या जवळ मजबूत आधार मिळाला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT