- चार राज्यात मोठा विजय प्राप्त, डबल इंजिनच सरकार गोव्यात 5 वर्षात अनुभवले, गोव्याचा चेहरा बदललाय. हा विजय मोदींना समर्पीत करत असल्याचं फडणवीस म्हणाले.
- अतिशय चांगला विजय गोव्याच्या जनतेने दिला गोव्याच्या जनतेचे आभार, ३ अपक्षांनी पाठिंबा दिला आहे.
- काही लोकांना आम्ही सोबत घेऊ असे म्हटले होते , mgp आमच्या सोबत आहे , 25 लोकांच्या चांगल्या मजोरीटीने सरकार स्थापन करू असे फडणवीस म्हणाले.
- मेजोरीटी असल्याने आम्हाला धावपळ करण्याची गरज नाही , काल काँग्रेसने आजची 3 वाजताची वेळ मागितली पण काँग्रेस तिकडे जाण्याच्या स्थितीत नाही.
- आम्ही २२+ जागांचा विचार केला होता.
मात्र आम्हाला काही जागांवर म्हणावं तसं यश मिळू शकलं नाही.
- १० वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही सत्ता स्थापन करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत.
- गोव्यातील जनतेपर्यंत आम्ही खऱ्या अर्थाने विकास पोहोचवला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.''मगो भाजपसोबत, सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा...
मगो पक्षाने पत्र लिहून भाजपाला सपोर्ट केला आहे. भाजपने गोव्यात जवळपास २० जागा मिळवल्या आहेत. मगोच्या या सपोर्टने आता भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 3 अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू: गोवा भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे
सुशांत सावंत
पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले असून, पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे गोवा निकालाची. त्याचे कारण म्हणजे या निवडणुकीचे जबाबदारी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने. गोव्यात भाजपला 20 जागा जिंकन्यात यश आले असून, या यशामागे देवेंद्र फडणवीस आखलेल्या रणनितीची चर्चा सुरू झाली आहे.
(सुशांत सावंत)
गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे उद्या जोरदार स्वागत
सकाळी एअरपोर्टवर भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पोचणार
भाजपचे राज्यातील सर्व आमदार करणार फडणवीसांच स्वागत
भाजप कार्यालयात भाजपच्या विजयाचा उत्सव साजरा होणार
सकाळी ८:३० वाजता एअरपोर्ट होणार स्वागत
"आम्हाला गोव्यातील जनतेचा निर्णय मान्य आहे. अनेक अडथळ्यांना न जुमानता आमचे उमेदवार धाडसाने लढले. लोकांनी भाजपला (Goa BJP) सत्तेसाठी कौल दिला आहे आणि आम्ही ते मान्य करतो. अनेक मतदारसंघात आमचा फार कमी फरकाने पराभव झाला," असे काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले.
बाबुश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात पणजी आमि तोलैगोवा मतदार संघातून विजय भाजपचे विश्वजीत राणे आणि त्यांची पत्नी दिव्या विश्वजीत राणे देखील वालपोई आणि पोरियम मतदार संघातून विजयी
भाजपवर विश्वास आणि प्रेम दाखविल्याबद्दल त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याबद्दल मी गोव्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो.
भाजप : 20
काँग्रेस : 11
आप : 2
मगो : 2
आरजीपी : 1
अपक्ष : 3
गोवा फॉरवर्ड पार्टी : 1
तृणमूल काँग्रेस : 0
राष्ट्रवादी : 0
माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक होतं कारण मी राज्यभर प्रचार करत होतो पण माझ्या स्वतःच्या मतदारसंघात पोहोचू शकलो नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला. मी कमी फरकाने जिंकलो पण आम्ही (भाजप) बहुमताने जिंकलो. ही मोठी गोष्ट आहे. आमच्या 20 जागा निश्चित झाल्या असून, 3 अपक्षांकडून पाठिंबा जाहीर झाला आहे.
गोव्यातील जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. आम्हाला 20 जागा मिळतील किंवा 1-2 जागा जास्त मिळतील. जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. अपक्ष उमेदवार आमच्यासोबत येत आहेत. एमजीपीही आमच्यासोबत येत आहे आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही आमचे सरकार बनवू: भाजप नेते देवेंद्र फडणवीस
१) हळदोणे
विजयी - ग्लेन टिकलो (भाजप)
- कार्लोस फरेरा (काँग्रेस)
२) बाणावली
विजयी - व्हेन्झी व्हिएगस (आप)
- टोनी डायस (काँग्रेस)
- चर्चिल आलेमाव (तृणमूल)
३) डिचोली
विजयी -चंद्रकांत सावळ (अपक्ष)
- नरेश सावळ (मगो)
- राजेश पाटणेकर (भाजप)
४) कळंगुट
विजयी - मायकल लोबो (काँग्रेस)
- जोसेफ सिक्वेरा (भाजप)
५) काणकोण
विजयी - रमेश तवडकर (भाजप)
- जनार्दन भंडारी (काँग्रेस)
- इजिदोर फर्नांडिस (अपक्ष)
६) कुठ्ठाळी
विजयी - गिरीश पिल्लई (अपक्ष)
- आंतोनियो वाझ (अपक्ष)
- गिल्बर्ट रॉड्रिग्स (तृणमूल)
७) कुंभारजुवे
विजयी - राजेश फळदेसाई (काँग्रेस)
- रोहन हरमलकर (अपक्ष)
८) कुंकळ्ळी
विजयी - युरी आलेमाव (काँग्रेस)
- क्लाफास डायस (भाजप)
- विल्सन कार्दोझ (रिव्होल्युशनरी गोवन्स)
९) कुडचडे
विजयी - नीलेश काब्राल (भाजप)
- अमित पाटकर (काँग्रेस)
१०) कुडतरी
विजयी - आलेक्स रेजिनाल्डा लॉरेन्स (अपक्ष)
- रुबर्ट परेरा (रिव्होल्युशनरी गोवन्स)
- डॉमनिक गावकर (आप)
११) दाबोळी
विजयी - माविन गुदिन्हो (भाजप)
- कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस (काँग्रेस)
१२) फातोर्डा
विजयी -विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड)
- दामू नाईक (भाजप)
१३) मये
विजयी - प्रेमेंद्र शेट (भाजप)
- संतोष सावंत (गोवा फॉरवर्ड)
१४) मांद्रे
विजयी - जीत आरोलकर (मगो)
- दयानंद सोपटे (भाजप)
- लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष)
१५) म्हापसा
विजयी - जोशुआ डिसोझा (भाजप)
- सुधीर कांदोळकर (काँग्रेस)
१६) मडकई
विजयी - रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर (मगो)
- प्रेमानंद गावडे (रिव्होल्युशनरी गोवन्स)
- सुदेश भिंगी (भाजप)
१७) मडगाव
विजयी - दिगंबर कामत (काँग्रेस)
- मनोहर (बाबू) आजगावकर (भाजप)
१८) मुरगाव
विजयी - संकल्प आमोणकर (काँग्रेस)
- मिलिंद नाईक (भाजप)
१९) नावेली
विजयी - आवेर्तान फुर्तादो (काँग्रेस)
- वालंका आलेमाव (तृणमूल)
- प्रतिमा कुतिन्हो (आप)
२०) नुवे
विजयी - आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस)
- अरविंद डिकॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स)
२१) पणजी
विजयी - आतानासियो (बाबूश) मोन्सेरात (भाजप)
- उत्पल पर्रीकर (अपक्ष)
- एल्विस गोम्स (काँग्रेस)
२२) पेडणे
विजयी - प्रवीण आर्लेकर (भाजप)
- राजन कोरगावकर (मगो)
२३) फोंडा
विजयी - केतन भाटीकर (मगो)
- राजेश वेरेकर (काँग्रेस)
- रवी नाईक (भाजप)
२४) पर्ये
विजयी - दिव्या राणे (भाजप)
- विश्वजीत कृ. राणे (आप)
२५) पर्वरी
विजयी - रोहन खंवटे (भाजप)
- संदीप वझरकर (तृणमूल)
२६) प्रियोळ
विजयी - पांडुरंग (दीपक) ढवळीकर (मगो)
- गोविंद गावडे (भाजप)
२७) केपे
विजयी - एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस)
- चंद्रकांत (बाबू) कवळेकर (भाजप)
२८) साळगाव
विजयी - केदार नाईक (काँग्रेस)
- जयेश साळगावकर (भाजप)
२९) सांगे
विजयी - सुभाष फळदेसाई (भाजप)
- सावित्री कवळेकर (अपक्ष)
- प्रसाद गावकर (काँग्रेस)
३०) साखळी
विजयी - डॉ. प्रमोद सावंत (भाजप)
- धर्मेश सगलानी (काँग्रेस)
३१) सावर्डे
विजयी - गणेश गावकर (भाजप)
- दीपक प्रभू पाऊसकर (अपक्ष)
- विनायक गावस (मगो)
३२) शिवोली
विजयी - दिलायला लोबो (काँग्रेस)
- दयानंद मांद्रेकर (भाजप)
३३) शिरोडा
विजयी - सुभाष शिरोडकर (भाजप)
- महादेव नाईक (आप)
३४) सांत आंद्रे
विजयी - वीरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स)
- फ्रान्सिस सिल्वेरा (भाजप)
३५) सांताक्रूझ
विजयी - रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस)
- अंतोनियो फर्नांडिस (भाजप)
- अमित पालेकर (आप)
३६) ताळगाव
विजयी - जेनिफर मोन्सेरात (भाजप)
- टोनी रॉड्रिग्स (काँग्रेस)
३७) थिवी
विजयी - नीळकंठ हळर्णकर (भाजप)
- कविता कांदोळकर (तृणमूल)
३८) वाळपई
विजयी - विश्वजीत राणे (भाजप)
- तुकाराम (मनोज) परब (रिव्होल्युशनरी गोवन्स)
३९) वास्को
विजयी - कृष्णा (दाजी) साळकर (भाजप)
- कार्लुस आल्मेदा (काँग्रेस)
४०) वेळ्ळी
विजयी - क्रूझ सिल्वा (आप)
- सावियो डिसिल्वा (काँग्रेस)
गोव्यात भाजपला तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा, सूत्रांची माहिती
बिचोलीमचे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेटे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
गोव्यात ‘आप’ने दोन जागा जिंकल्या आहेत. कॅप्टन वेंझी आणि क्रूझ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. ही गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची सुरुवात आहे, असे ट्विट आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केले.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटच्या माहितीनुसार गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले असून भाजप 18 तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे.
आम्ही जिंकू, असे वाटले होते, पण आम्हाला जनतेचा जनादेश स्वीकारावा लागेल. आम्हाला 12 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भक्कमपणे काम करू. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसला कठोर परिश्रम करावे लागतील: काँग्रेस नेते मायकल लोबो
पेडण्यातील भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर विजयी
काँग्रेस खोटी आश्वासने देते; भाजपने विकास केला आहे... आमचा पक्ष संरचनात्मक पक्ष आहे, आम्ही निकाल आल्यानंतर आणि आमच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याचा विचार करू. संसदीय मंडळ निर्णय घेईल: भाजप गोवा डेस्क प्रभारी सी टी रवी
सरकार स्थापन करण्यासाठी गोव्यात भाजपच्या हालचाली
भाजप नेते आज राज्यपालांना भेटणार
14 मार्चला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शपथविधी होणार, सूत्रांची माहिती
आपचे बाणावली मतदारसंघाचे उमेदवार व्हेंजी व्हिएगास यांचा विजय
कळंगुटमधून काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो विजयी
गोव्यात राज्यकीय हालचालींना वेग
भाजपचा कार्यकर्ता माझ्यासाठी नाही तर विरोधी उमेदवारासाठी काम करतो, काँग्रेसशी लढलो. काही कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही जागा राखण्यात यशस्वी झालो: अतानासिओ बाबुश मोन्सेरात, पणजीतील भाजपचे उमेदवार
गोव्यात भाजप सरकार स्थापन करणार; आम्ही एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ, असे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
डिचोली मतदारसंघात अपक्ष चंद्रकांत शेट्ये विजयी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघाच्या बाजूला डिचोली मतदार संघ
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी
गोव्यात भाजप अगदी बहुमताच्या जवळ
साखळी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी पराभूत
साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ५०० मतांनी विजय
शिरोडा मतदारसंघ – भाजपचे सुभाष शिरोडकर विजयी
थिवी मतदार संघातून भाजप उमेदवार नीळकंठ हळर्णकर 2018 मतांनी विजयी
राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत.
गोवा फाॅरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई विजयी
फातार्डो मतदारसंघातून गोवा फाॅरवर्डचे उमेदवार विजय सरदेसाई विजयी
भाजपच्या अजून एका उमेदवाराला या विधानसभा निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाले आहे. वाळपई मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विश्वजित राणे हे 8300 मतांनी विजयी झाले आहेत.
पणजी मतदारसंघातून भाजपचे बाबुश मोन्सरात विजय
मनोहर पर्रिकरांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का
बाबुश मोन्सरात ८०० मतांनी विजयी
भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली.
पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला आहे.
पणजीत भाजप समर्थक जल्लोष करत आहेत, तर उत्पल पर्रीकर यांच्या गोटात शांतता आहे.
भाजप 19 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, काँग्रेस 10 मतदार संघातून आघाडीवर आहेत, मगो 4 मतदारसंघातून, अपक्ष उमेदवार 3 मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
भाजपचे नेते विश्वजीत राणे यांनी गोव्यातील निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितेल की, गोव्यात आम्ही मोठे यश मिळवले आहे. लोकांनी घोटाळेबाज आणि बाहेरच्यांना नाकारले आहे. गोव्यातील लोकांसाठी ज्या पक्षाने काम केले त्यांनाच जनतेने मतदान केले. विश्वजीत राणे प्रमोद सावंत यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, प्रमोद सावंत मुख्यमंत्री पदी कायम राहाणार की नाही याबाबत पक्ष निर्णय घेईल.
वाळपई मतदारसंघातून आरोग्यमंत्री विश्वजित राणे विजयाच्या उंबरठ्यावर
विश्वजित राणे हे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत विजयी
मडगाव मतदारसंघातून केला भाजपाचे उमेदवार बाबू आसगावकर यांचा केला पराभव
🟢बाबूश मोन्सेरात: 4397
🔴एल्विस गोम्स: 1898
🔴उत्पल पर्रीकर: 3693
पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात 334 मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीनंतर साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 605 मतांनी आघाडीवर. शिवोलीत दयानंद मांद्रेकर, मडगावात दिगंबर कामत पुढे.
आम्ही निकालाचे ट्रेंड पाहत आहोत; गोव्यातील जनतेने परिवर्तनाला कौल दिला आहे: गिरीश चोडणकर, गोवा काँग्रेस अध्यक्ष
मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे 300 मतांनी आघाडीवर आहेत.
भाजप : 18
काँग्रेस : 12
आप : 1
मगो : 5
इतर : 3
तिसऱ्या फेरी अखेर पणजीमध्ये भाजप आघाडीवर
भाजपचे बाबुश मोन्सरात यांना 2981 मते
अपक्ष उत्पल पर्रिकर यांना 2647 मते
मडगांव काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत 2800 मतांनी आघाडीवर...तर भाजपचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर पिछाडीवर
गोव्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या फेरीनंतर पिछाडीवर आहेत
भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री पिछाडीवर, काँग्रेस उमेदवारांची आघाडी
साळगावमधून केदार नाईक आघाडीवर, तर जयेश साळगावकर पिछाडीवर आहेत
मये मतदरसंघांतून प्रेमेंद्र शेट 1000 मतांनी आघाडीवर
सांतआंद्रेमधून भाजप उमेदवार फ्रान्सिस्को सिल्वेरा आघाडीवर
काँग्रेस उमेदवार कार्लोस फरेरा 1957 मतांनी आघाडीवर
गोवा.. 38/40
भाजप- 13
काँग्रेस- 15
स्वतंत्र-2
आप- 1
MGP-6
गोवा.. 38/40
भाजप- 13
काँग्रेस- 15
स्वतंत्र-2
आप- १
MGP-6
(Mgp किंगमेकर होण्याची शक्यता)
गोव्यात भाजप पहिल्या फेरीत पुढे गेला आहे. भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस 17 जागांवर पुढे आहे. टीएमसी 3 जागांवर आघाडीवर आहे.
पणजी: बाबूश मोन्सेरात
ताळगाव : जेनिफर मोन्सेरात
म्हापसा: ज्योशुआ डिसोझा
हळदोणा: ग्लेन टिकलो
सांतआंद्रे: वीरेश बोरकर
सांताक्रुझ: रुडॉल्फ
साळगाव : जयेश साळगावकर
साखळी: धर्मेश सगलानी
थिवी: नीळकंठ हळर्णकर
शिवोली: दयानंद मांद्रेकर
मये: प्रेमेंद्र शेट
पेडणे: राजन कोरगावकर
मांद्रे :जीत आरोलकर
डिचोली: चंद्रकांत शेट्ये
कुंभारजुवे :राजेश फळदेसाई
वाळपई: विश्वजीत राणे
पर्ये: दिव्या राणे
पोस्टल बॅलेट मतांच्या आकडेवारीनुसार भाजप 14, कॉंग्रेस 17, मगो 4 आणि इतर 1 अशी मतविभागणी झाली आहे.
-विजय सरदेसाई देखील 593 मतांनी आघाडीवर, जोशुआ डिसुझा151 तर दयानंद माेंडलेकर 157 मतांनी आघाडीवर
-नॉर्थ गोव्यात बेलेट पोस्टल मध्ये बीजेपी पुढे असल्याची माहिती समोर येत आहे. बीजेपी -9 काँग्रेस-8
-गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई फातोर्डा मतदारसंघातून 593 मतांनी आघाडीवर
- शिवोली मतदार संघातून 157 मतांनी दयानंद मांद्रेकर आघाडीवर आहेत
- अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड कुडतरी मतदारसंघातून आघाडीवर..
- बाबूश मोन्सेरात यांची पत्नी ताळगाव येथून जेनिफर मोन्सेरात यादेखील आघाडीवर आहेत.
पोस्टल मतमोजणीत 436 मतांनी प्रमोद सावंत मागे
बाबुश मोंत्सेरा पणजी येथून 383 ने आघाडीवर; त्याचप्रमाणे त्यांची पत्नी ताळगाव येथून जेनिफर बाबूश मोन्सेरात यादेखील आघाडीवर आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वाळपई मधून भाजपचे विश्वजित राणे हे 1300 तर पर्येमधून दिव्या राणे या 2600 मतांनी आघाडीवर आहेत च्या पहिल्या टप्प्यात वाळपई मधून विश्वजित मतांनी राणे हे 1300 मताने तर पर्यायांमधून दिव्या राणे या 2600 मताने आघाडीवर आहेत.
- उत्पल यांनी पहिल्या टप्प्यात पणजीत आघाडी घेतली आहे.
-मांद्रे मतदारसंघात लक्ष्मीकांत पारसेकर आघाडीवर
-मांद्रे मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीचया रिंगणात पोस्टल मतदानाचा कल
काही वेळापूर्वी भाजप सर्वाधिक जागांवर होते मात्र आता गोव्यात काँग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप १६ जागांवर तर टीएमसी केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे.
गोव्यात भाजप आणि काँग्रेस दोघांनी खातं उघडलं
सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही पक्षांना एक-एक जागेवर आघाडी
मडगाव मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू
सुरवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरू
सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएम उघडले जातील.
10 हजार 274 बॅलेट पेपरची मतमोजणी
पोस्टल मतदान आणि बॅलेट पेपर मोजणीला सुरुवात
दोन ठिकाणी पोस्टल बॅटेल पेपरच्या मतमोजणीला 15 मिनिटे लागणार
80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आले होते बॅलेट पेपर
(संभाजी थोरात)
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष निकालानंतर भूमिका स्पष्ट करणार
मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांची माहिती
तृणमूलचे अभिजित बॅनर्जी गोव्यात आलेत त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय
तृणमूल, मगो एकत्र निर्णय घेणार
मगोला 9 जागा मिळणारअसल्याचा ढळीकरांना विश्वास
मतमोजणीआधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक देवळात
गोव्यात उमेदवार आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम नुकत्याच उघडण्यात आल्या आहेत. पोस्टल मतपत्रिका सुरक्षा कर्मचार्यांच्या कॉरिडॉरमधून मतमोजणी हॉलमध्ये नेल्या जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.