Oil price surge Saam
देश विदेश

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

Global Economic Crisis : आखाती देशांतील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर, महागाई आणि अन्नधान्याच्या किंमती वाढून जागतिक मंदीचा धोका निर्माण झाला आहे.

Suprim Maskar

Oil price surge : आखाती देशातील युद्धामुळे नवं संकट जगाचं दार ठोठावतंय... युद्धाची धगीने जगभर वनवा पेटण्याची शक्यता आहे... मात्र हे संकट कोणतं आहे...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

इस्रायल- अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता फक्त सीमेपुरता मर्यादीत न राहता युद्धाची धग जगाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे...युद्धाची झळ आता पेट्रोल आणि डिझेलपुरती मर्यादीत न राहता, सर्वसान्यांच्या घरापर्यंत पोहचणार आहे..कारण.खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF नेच युद्ध असंच सुरू राहील तर जगावर मंदीचं संकट कोसळणार असल्याचा इशारा दिलाय...

आखाती देशांकडून होणाऱ्या खतांच्या पुरवठ्यात अडथळा आल्यास शेतीचा खर्च मर्यादेबाहेर जाईल...त्यात होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जगाच्या 25-30% तेल पुरवठ्याला आणि 20 % गॅस पुरवठ्याला धोका निर्माण झालाय... ब्रेंट क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल 115 डॉलरवर पोहचलेत...भारतासारख्या प्रमुख तेल-आयातदार देशांच्या आणि कच्च्या मालासाठी बाह्य पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या युरोपीय अर्थव्यवस्थांच्या अडचणी वाढतील. तसचं युद्ध सुरु राहिल्यास भविष्यात जगाला 'स्टॅगफ्लेशन' (Stagflation) चा सामना करावा लागू शकतो. म्हणजे एकीकडे महागाई वाढणार आणि दुसरीकडे आर्थिक विकास दर घटणार. अशावेळी आर्थिक अनिश्चिततेमुळे बँकांचे व्याजदर वाढू शकतात, ज्यामुळे गृहकर्ज किंवा व्यावसायिक कर्ज घेणं कठीण होईल.

दुसरीकडे इंधन टंचाईचे चटके सोसत असलेल्या भारतावर युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो... पाहूयात...

भारतासारख्या विकसनशील देशांमधील सामान्य कुटुंब आपल्या उत्पन्नापैकी 36% रक्कम अन्नावर खर्च करतं. तर श्रीमंत देशांमध्ये हे प्रमाण केवळ 9% आहे. अशावेळी इंधन आणि खतं महागल्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढतील आणि सामाजिक अस्थिरतेची भीती निर्माण होईल. तसचं कच्च्या तेलाचे दर वाढल्याने प्रत्येक वस्तू महागेल.

युद्धामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढल्यास आशिया आणि आफ्रिकेतील देशांसाठी हे संकट प्राणघातक ठरू शकतं. या मंदीमुळे कोरोना आणि इतर संकटातून सावरणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर या युद्धामुळे पाणी फेरले जाईल... त्यामुळे युद्धाचा फटका विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेला बसण्याआधीचयुद्धावर तोडगा काढायला हवा...

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

SCROLL FOR NEXT