दुर्दैवी : कुत्र्याला मारण्यासाठी टाकलेली विषारी बिस्कीट खाल्ल्याने 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
दुर्दैवी : कुत्र्याला मारण्यासाठी टाकलेली विषारी बिस्कीट खाल्ल्याने 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू Saam TV
देश विदेश

दुर्दैवी : कुत्र्याला मारण्यासाठी टाकलेली विषारी बिस्कीट खाल्ल्याने 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शेजारचा कुत्रा सारखा भुंकतोय म्हणून कोणीतरी कुत्र्यासमोर (Dog) विषारी औषध मिसळलेली बिस्कीट टाकली आणि तीच बिस्कीटं 2 वर्षांच्या चिमुरडीने खाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

आपण अनेकदा अशा लोकांना पाहतो ज्यांना प्राण्यांबद्दल चिड असते असे लोक कधी कुत्र्यांना मारताना फेकून देतात त्याचे व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर (Social Media) वायरल करत असतात अशाच एका नराधम व्यक्तीने कुत्र्याला मारण्यासाठी कुत्र्यासमोर टाकलेल्या बिस्कीटांमध्ये विषारी औषध मिसळलं, मात्र दुर्दैवाने ती बिस्कीट मैत्रिणीसोबत बागेत खेळत असणाऱ्या दोन वर्षाच्या चिमुरडीने खाल्ल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सदरची दुर्दैवी घटना 3 फेब्रुवारीला मेक्सिकोतील जालिस्को राज्यात घडली असून त्या मृत चिमुरडीचं नाव हायडी वलेरिया (Heidi valeria) असं आहे. तसंच तिचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय स्थानिक अधिकारी एपिग्मेनियो कारिलियो यांनी व्यक्त केला आहे.

हायडीचे कुटुंब तोतोलान भागात राहात होती. तिच्या शेजारच्यांनी आरोप केला आहे की हायडीच्या घरातील कुत्रा (Dog) सतत भुंकांयचा आणि त्याला गप्प करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने कुत्र्यासमोर विषारी बिस्कीटं टाकली. होती आणि तिच बिस्कीटं हायडीने खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान या कुत्र्याला ती बिस्कीटं कोणी खायला घातली होती याचा शोध सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

SCROLL FOR NEXT