Girl Filed Case Against Her Parents Saam TV
देश विदेश

Shocking News: माझ्या परवानगी शिवाय मला जन्म का दिला? तरुणीने आई-वडिलांवरच केली केस!

Girl Filed Case Against Her Parents: माझ्या परवानगी शिवाय मला जन्म का दिला? असं म्हणत तरुणीने जन्मदात्या आई वडिलांवरच केस केली आहे.

Satish Daud

Girl Filed Case Against Her Parents: जगात जीवन जगत असताना प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात. कुणाला नोकरी मिळत नाही. तर कुणाला नोकरी आणि पण त्यावर तो समाधानी नाही. काही लोकांकडे पैसा नाही, तर काहींकडे इतका पैसा आहे, की तो खर्च कसा करावा हेच समजत नाही. (Breaking Marathi News)

काही लोकांना असंही वाटतं की आपण माणसाचा जन्मच का घेतला? अनेकजण मनातल्या मनात या गोष्टीवर विचार करत असतो. पण एक तरुणी आपल्या आयुष्यावर इतकी नाराज झाली की तिने थेट आई-वडिलांवरच खटला भरला.

या तरुणीने असं नेमकं का केलं? याचे कारण ऐकल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तरुणीने आपण आई-वडिलांवर गुन्हा का दाखल केला? याचं कारण सांगितलं आहे.  (Latest Marathi News)

कास थियाज असं या महिलेचं नाव असून तिची तक्रार ऐकून अनेकांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. काहींनी या तरुणीला वेड्यात काढलंय. तर काहीजण तिला उटल प्रश्न विचारत आहेत. तू स्वतः आई असताना आई-वडिलांची अशी तक्रार कशी का करू शकते? असा सवालही नेटकऱ्यांनी या तरुणीला विचारला आहे.

'जन्म देण्यापूर्वी मला विचारले नाही'

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत (Viral Video) कास थियाज म्हणते, "मी या जगात फक्त माझ्या आई-वडिलांमुळेच आले आहे. जर त्यांनी मला जन्म दिला नसता, तर मी या जगाचं तोंडही पाहिलं नसतं. त्यांच्यामुळे मला आता विविध प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे, असं या तरुणीने म्हटलं आहे. आलीच नसती. त्यामुळे तिला विविध प्रकारच्या संकटांना तोंडच द्यावे लागले नसते.

इतकंच नाही तर, माझ्या आई-वडिलांना माझ्या परवानगीशिवाय मला जन्म कसा दिला? असा सवालही या तरुणीने केला आहे. मला जन्म घ्यायचा आहे की नाही हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. मला तेव्हा माहीत नव्हते की मोठे झाल्यावर मला स्वतःला उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करावी लागेल.

पुढे बोलताना कास थियाज म्हणते, मला आधी कळले असते तर कदाचित मी या पृथ्वीवर आलेच नसते. मुलांना त्यांच्या परवानगी शिवाय जन्म देणे योग्य नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला दत्तक घेतात तेव्हा त्याची एवढी तरी इच्छा असते, की त्याला दत्तक घेणाऱ्या आई-वडिलांकडे राहायला आवडेल की नाही. दरम्यान, कास थियाजचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिला वेड्यात काढलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT