Crime News Saam tv
देश विदेश

Shocking Crime: तृतीयपंथीयांचं गुरू होण्यासाठी गुप्तांग कापलं, किन्नर प्रमुखाला धाडायचं होतं जेलमध्ये पण..

Man cuts private part to join trans community: तृतीयपंथीयांचं गुरू होण्यासाठी एकानं गुप्तांग कापलं. नंतर तृतीयपंथी गुरूंना अडकवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासात आरोपी आणि संजयने रचलेला कट उघडकीस आला.

Bhagyashree Kamble

तृतीयपंथीयांचे गुरु बनण्यासाठी आणि तृतीयपंथीयांच्या गुरूंना अडकवण्यासाठी एकानं कट रचला. या कटात काही तृतीयपंथी देखील सामील होते. यासाठी एकानं गुप्तांग कापलं आणि गुरूंना अडकवण्याचा प्लॅन आखला. पण पोलिसांच्या तपासात वेगळंच चित्र समोर आलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील शाहपूरच्या बम्‍हैटा गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यादव याला तृतीयपंथीयांचे गुरु बनायचे होते. तो स्वतः काही तृतीयपंथीयांसोबत राहत होता. मात्र, तृतीयपंथीयांच्या नियमांनुसार, तृतीयपंथी बनण्यासाठी स्वतःचे प्रायव्हेट पार्ट कापावे लागते. त्याशिवाय तृतीयपंथीयांमधील ते सदस्य बनू नाही शकत.

यासाठी काही तृतीयपंथी आणि संजयने मिळून एक कट रचला. या कटात तृतीयपंथीयांच्या गुरूंना अडकवून त्यांना तुरुंगात पाठवण्याचा त्यांचा इरादा होता. कारण काही तृतीयपंथीयांसोबत त्यांचे आपापसात वैर होते.

रचलेल्या कटाप्रमाणे आणि संजयच्या सहमतीने त्याने तृतीयपंथी सहकाऱ्याच्या मदतीने ऑपरेशन केलं. याकामासाठी तानिया खानला संजयने १० हजार रुपये दिले होते.

यानंतर संजयचा मुलगा प्रिन्सने पोलिसांकडे पारो किन्नर विरोधात गुन्हा दाखल केला. वडिलांचा गुप्तांग कापल्याचा आरोप त्यानं केला. पोलिसांनी तपास केला असता, संजय आणि त्याच्या तृतीयपंथी सहकाऱ्यांनी मिळून हा कट रचला असल्याचं समोर आलं. आरोपींना अटक केल्यानंतर समोर आलेल्या खुलाशांमुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटले. सध्या तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT