Rain Update  Saam Tv
देश विदेश

India Weather Update: उकाड्यातून होणार सुटका! देशातील अनेक राज्यात कोसळणार पावसाच्या सरी; महाराष्ट्रातल्या 'या' भागांना ऑरेंज अलर्ट!

Latest News: या पावासामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला खरा पण या देशातील शेतकरी अडचणीत आला आहे.

Priya More

Delhi News: देशावर सध्या अवकाळी पावासाचे (Unseasonal Rain) सावट आहे. एप्रिल महिना संपत आला तरी देखील अनेक राज्यात पाऊस (Rainfall) पडत आहे. ऐकीकडे या पावासामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला खरा पण या अवकाळी पावसामुळे देशातील शेतकरी अडचणीत आला आहे. पिंकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. अशामध्ये भारतीय हवामान खात्याने पुन्हा देशातील अनेक राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून देशातील अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून उत्तर-पश्चिम मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मंगळवार ते गुरुवारपर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण मध्य प्रदेशच्या अनेक भागात वादळी वारे वाहू शकतात. तामिळनाडू आणि केरळ या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत हवामान खात्याने हे देखील स्पष्ट केले आहे की, 24 एप्रिल म्हणजेच सोमवारपासून ते 30 एप्रिलपर्यंत देशात कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.

अशामध्ये महाराष्ट्राला अवकाळी पावासाचा चांगलाच फटका बसला आहे. राज्यातल्या अनेक भागात अजूनही अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये हवामान खात्याने नुकताच वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासोबतच गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचसोबत विदर्भातील काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 आणि 26 एप्रिल रोजी विदर्भातील भंडारा चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर गारपिट होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, या ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

SCROLL FOR NEXT