भारतात कोरोनाची लस घेतल्यानंतर जे प्रमाणपत्र दिले जाते त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असतो. लसीकरणच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असावा की नसावा यावर मोठा गदारोळ सुरु आहे. मात्र दीप्ती ताम्हणे नावाच्या भारतीय महिलेला एक वेगळाच अनुभव आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी आपल्या मैत्रिणीसोबत घडलेला हा किस्सा फेसबुकवर सांगितला आहे. german airport security officer laugh to watch modi's photo on corona vaccine certificate
लंडनला जाताना दिप्ती नावाच्या भारतीय महिला फ्रँकफर्ट एअरपोर्टवर पोहोचल्या. तेव्हा तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिप्ती यांच्याकडे कोरोना लसी घेतली असल्याचे प्रमाणपत्र मागितले. दिप्ती यांनी स्वतःचे लसीकरण प्रमाणपत्र संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. मात्र हे प्रमाणपत्र पाहुन ते अधिकारी गोंधळले.
प्रमाणपत्रावर दिप्ती यांचा फोटो नसून कुण्या दुसऱ्याच व्यक्तीच्या लसीकरणाचे हे प्रमाणपत्र असावे, असं त्या सुरक्षा अधिकाऱ्यांना वाटलं. त्यामुळे ते अधिकारी दिप्ती यांना म्हणाले की, ''अहो तुमचे सर्टिफिकेट द्या हे कुणाचे तरी दुसऱ्याचेच आहे.'' मात्र दिप्ती यांनी त्या सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं की, हे लसीकरणाचे सर्टिफिकेट माझेच असून यावरील फोटो हा आमच्या पंतप्रधानांचा आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्याने आपल्या सहकार्याला मोदींचा फोटो असलेले प्रमाणपत्र दाखवले आणि दोघेही खळखळून हसू लागले. असं दिप्ती यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.