Wedding Preparations Turn Tragic 11 Injured in Cylinder Explosion Saam
देश विदेश

लग्न सराईची लगबग अन् क्षणात अनर्थ घडलं; गॅस सिलिंडरचा स्फोट, टाकीचे तुकडे उडाले, ११ जण जखमी

Wedding Preparations Turn Tragic 11 Injured in Cylinder Explosion: जोधपूरच्या बावडी परिसरातून धक्कादायक माहिती समोर. लग्नाच्या तयारीदरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट. स्फोटात ११ जण जखमी; त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर.

Bhagyashree Kamble

जोधपूर जिल्ह्यातील बावडी परिसरातील हरधानी शहरात लग्नाच्या तयारीदरम्यान एक मोठा अपघात झाला. गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट झाल्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. या घटनेत सुमारे ११ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, गावातील बिराराम नावाच्या व्यक्तीच्या घरात लग्नसराईची तयारी सुरू आहे. घर रंगवण्याचं काम सुरू आहे. तसेच रिफिनिशिंगचे काम सुरू होते. एका वेल्डिंग कामगाराने गॅस सिलिंडरजवळ वेल्डिंगचे काम सुरू केले. लग्नासाठी ठेवलेल्या दुसऱ्या एका गॅस सिलिंडरमधून गॅस गळती झाली. वेल्डिंगची ठिणगी सिलिंडरवर आदळताच स्फोट झाला.

स्फोटानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. सिलिंडरचे तुकडे उडून जवळच्या लोकांवर आदळले. यामुळे अनेक लोक जखमी झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर भाजलेल्या लोकांना रूग्णालयात उपचारासाठी नेलं. सध्या रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

एमडीएम रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विकास राजपुरोहित यांनी सांगितले की, काही रूग्ण धोक्याबाहेर आहेत. बाकी लोक गंभीर भाजल्यामुळे त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण पोलीस उपअधिक्षक भोपाळ सिंह लखावत यांनी सांगितले की, सर्व जखमींना वेळेवर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, ही घटना गॅस गळती आणि वेल्डिंग स्पार्कमुळे झालेल्या स्फोटामुळे घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदिल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा मोठा निर्णय! भाजपसोबत युती नाही

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT