g20 Saam TV
देश विदेश

G20 Summit : जी २० शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, कशी आहे व्यवस्था?

G20 Summit 2023 Delhi : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रमोद जगताप

G-20 Summit Information in Marathi:

जी २० समुहाच्या ९ आणि १० सप्टेंबरला होणाऱ्या शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर होणाऱ्या परिषदेला जी २० देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यंदा जी २० परिषदेचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

काय आहे G-20 Summit?

जी २० युरोपियन युनियनसह विकसीत आणि विकसनशील २० देशाची संघटना आहे. यामध्ये २० देशांच्या प्रमुखांची वार्षिक बैठक होते. जी G-20 चे हे समीट शिखर परिषद म्हणून ओळखले जाते. या परिषदेत मुख्य दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर भर दिला जातो.

जी २० देशाची आर्थिक ताकद?

जी २० देशाचा जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत ८५% वाटा आहे. जी २० देशात जगातली दोन तृतीयांश लोकसंख्या राहते. जी २० देशात जागतिक व्यापाराचा तब्बल 75% हिस्सा आहे. (Latest Marathi News)

जी 20 सदस्य देश (G-20 Summit Countries)

जी20 समूहात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनाडा, चीन, जर्मनी, फ्रांस, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, मेक्सिको, रूस, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम, अमेरिका आणि यूरोपीय संघचा समावेश आहे.

परिषदेला कोण कोण येणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक, जापानचे पंतप्रधान फिमियो किशिदो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बनीज, जर्मन चान्सलर, फ्रांसचे राष्ट्रपति इमॅन्युएल मॅन्क्रो, दक्षिण अफ्रीका, तुर्की आणि अर्जेंटीनाचे राष्ट्रपती भारतात येणार आहे.

राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था

राजधानी दिल्ली जी २० च्या पाहुण्यांसाठी सज्ज झाली आहे. जगातील मोठ्या देशाचे प्रमुख राजधानी दिल्ली इथं असल्यानं सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या पाहुण्यांसाठी 50 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या 50 हजार जवानांसह, पॅरामिलिट्री फोर्स, एनएसजी आणि सीआरपीएफ कमांडो तैनात असतील. दिल्लीतील उंच इमारतीवर एअरक्राफ्ट गन मशीन लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक घटनेवर नजर ठेवण्यासाठी 40,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणी फेस फेस रेकगनिशन कॅमेरे लावण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एंटी ड्रोन सिस्टीम तैनात आहे. संभावित धोके ओळखून प्रत्येक हॉटेलमधून पाहुण्यांना काढण्यासाठी वायुसेनाचे चॉपर तयार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

Jalna Rain : पावसाचा कहर; जालन्यात अतिवृष्टीत ९३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Accident: पिंपरीमध्ये अपघाताचा थरार! भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं, जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT