तालिबान आणि अन्य दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये मुक्तपणे संचार Saam Tv
देश विदेश

तालिबान आणि अन्य दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये मुक्तपणे संचार

पाकिस्तानमध्ये तालीबानी (Taliban and Pakistan) विजयाचा जल्लोष करत आहेत. तालीबानी लोक झेंडे फडकवत घोषणा देत आहेत.

वृत्तसंस्था

पाकिस्तानचे विरोेधी पक्षातील खासदार मोहसिन डावर यांनी सांगितले आहे की तालीबान आणि बाकी (Taliban and Pakistan) आंतकवादी संघटना खुलेआम रस्त्यावर फिरत आहेत. हे काम बिना सरकारी संरक्षणचे होऊ शकत नाही असेही ते म्हणाले आहेत. पाकिस्तानमध्ये तालीबानी विजयाचा जल्लौष करत आहेत. तालीबानी लोक झेंडे फडकवत घोषणा देत आहेत.

''आम्ही कायम संघर्ष अनुभवला आहे''

ANI च्या म्हणण्यानूसार अफगानी सैन्य आणि तालीबान यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे अनेक परिवार विस्थापित झाले आहेत. कुंदूजमध्ये राहणाऱ्या जीबाने सांगितले की ''त्यांनी या लढाईमध्ये आपल्या सगळ्या मुलांना गमावले आहे. आम्ही आयुष्यात कधी आनंद अनुभवला नाही, तर फक्त संघर्ष अनुभवला आहे असेही ती म्हणाली. त्याचबरोबर मोहम्मद हसन यांनी सांगितले या संघर्षात आम्ही चौथ्या वेळेस विस्थापित झालो आहोत. एका विस्थापित पुरुषाने सांगितले की त्याला ईद कधी आहे हे देखील माहित नाही. संयुक्त राष्ट्राच्या अनुसार आतापर्यंत जवळपास तीन लाख लोक विस्थपित झाले आहेत.

अफगानिस्तानमध्ये ईदमुळे संघर्ष निवळला

व्हिसा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमेरिका आपल्या सैन्यात काम करणऱ्या अफगाण सहयोगींना व्हर्जिनिया येथे घेऊन जाईल आणि त्यांना तेथील लष्करी तळावर ठेवेल. ईदमुळे अफगाणिस्तानात हिंसाचाराच्या घटना थांबल्या आहेत. काबूलमध्ये राष्ट्रपती पॅलेसला लक्ष्य करत अमेरिकेने या हल्ल्याचा निषेध केला आहे. दुभाषी, ड्रायव्हर किंवा अभियंता यासारख्या पदांवर अमेरिकेच्या सैन्याला मदत करणारे अडीच हजार अफगाण सहाय्यक आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्हर्जिनियामधील फोर्ट लीच्या लष्करी तळावर निवारा देण्यात येईल, अशी माहिती बायडन प्रशासनाने सिनेटला दिली आहे.

अफगाण मित्र देशांना तालिबान्यांची सतत धमकी आहे.

व्हिसा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच नेले जात आहे. व्हिसा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाला तिथेच रहावे लागेल. अमेरिकन सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या या अफगाण मित्र देशांना तालिबानकडून सतत धमकी दिली जात आहे. अमेरिकेने त्यांच्यासाठी विशेष इमिग्रेशन योजना सुरू केली आहे. प्रीटरच्या म्हणण्यानुसार अमेरिकेने ईदच्या दिवशी अध्यक्ष अशरफ घनी यांच्या वाड्यावर लक्ष्य केलेल्या रॉकेट हल्ल्यांचा निषेध केला आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, हिंसाचार मूर्खपणाचा होता आणि लवकरच यावर राजकीय उपाय शोधला गेला पाहिजे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT