Airtel च्या ग्राहकांसाठी खूषखबर! Jio ला देणार टक्कर

5G च्या बाबतीत ही एअरटेलची (5G In India) मोठी पैंज मानली जात आहे. कारण एअरटेलच्या आधी जिओने इंटेलच्या भागीदारीची घोषणा केली होती.
Airtel च्या ग्राहकांसाठी खूषखबर! Jio ला देणार टक्कर
Airtel च्या ग्राहकांसाठी खूषखबर! Jio ला देणार टक्करSaam Tv
Published On

दूरसंचार कंपनी एअरटेलने (Airtel) आज अमेरिकन चिपमेकर कंपनी इंटेलबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. 5G च्या बाबतीत ही एअरटेलची (5G In India) मोठी पैंज मानली जात आहे. कारण एअरटेलच्या आधी जिओने (Jio) इंटेलच्या भागीदारीची घोषणा केली होती. इंटेलचे गुंतवणूक युनीट इंटेल कॅपिटलने 2020 मध्ये 1864.50 कोटी रुपये जियो प्लॅटफॉर्मच्या इक्विटी स्केटमध्ये 0.39 टक्के भागभांडवल खरेदी केली होते. त्याच धर्तीवर एअरटेलने इंटेलबरोबर भागीदारी केली आहे. अशा परिस्थितीत एअरटेल 5G नेटवर्कच्या बाबतीत जिओपेक्षा मागे राहू इच्छित नाही.

इंटेलला एअरटेल बरोबरची नवीन भागीदारी vRAN / O-RAN तंत्रज्ञानाच्या मदतीने 5G नेटवर्क विकसित करण्यात मदत मिळेल. इंटेलबरोबरच्या भागीदारीमुळे एअरटेलला भारतात 5G चा रोडमॅप तयार होण्यास मदत होईल. एअरटेल हा भारतातील पहिला टेलिकॉम ऑपरेटर आहे. ज्याने लाइन नेटवर्कवर 5G चा लाइन डेमो दिला आणि या काळात 1 GBPS जोरदार स्पिड दिली होती. एअरटेचे अनेक शहरांमध्ये 5G चे ट्रायल घेत आहे. एअरटेल कंपनीने इंटेलच्या तिसर्‍या जनरेशनसाठी Xeon Scalable प्रोसेसरचा सर्पोट घेतला आहे. एअरटेलने भागीदारीत इंटेलच्या नवीन 3rd gen Xeon® स्केलेबल प्रोसेसर, एफपीजीए आणि ईएएसआयसी आणि इथरनेट 800 मालिकेचा वापर केला जाईल.

Airtel च्या ग्राहकांसाठी खूषखबर! Jio ला देणार टक्कर
मैने बोला था Go Corona Go, पर वो मेरे ही पीछे पड गया - रामदास आठवले

टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने 5G च्या ट्रायल दरम्यान वेगवान 5G स्पिड गाठण्याचा विक्रम केला आहे. एअरटेलने 5G चाचणी दरम्यान आतापर्यंत प्रति सेकंद 1000 गीगाबीटची वेगवान गती मिळविली आहे. मुंबईच्या लोअर परेल भागात असलेल्या फिनिक्स मॉल येथे कंपनीने 5G चाचणी चा लाइव्ह ट्रायल केला. तसेच एअरटेलने इतर अनेक शहरांमध्ये 5G चा ट्रायल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com