महिलांसाठी राक्षबंधनानिमित्त खास ऑफर; बस सेवा मोफत Saam Tv
देश विदेश

महिलांसाठी राक्षबंधनानिमित्त खास ऑफर; बस सेवा मोफत

बिहार सरकारचा परिवहन विभाग महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी विशेष भेट देणार आहे.

वृत्तसंस्था

पाटणा: बिहार सरकारचा Bihar Government परिवहन विभाग महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी (Rakshabandhan 2021) म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी विशेष भेट देणार आहे. बिहारमध्ये राखीच्या दिवशी महिलांना बिहार राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शहर सेवेच्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. म्हणजेच राखीच्या दिवशी बसमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. याचा थेट लाभ महिलांना मिळणार आहे.

हे देखील पहा-

बिहार सरकारच्या परिवहन विभागाच्या मंत्री श्रीमती शीला कुमारी म्हणाल्या की, शहर सेवा बसेसमध्ये आणि सुरक्षित प्रवासासाठी महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी रक्षा बंधनाला विशेष सुविधा पुरवल्या जातील. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेक संस्थांनी मोफत प्रवासाची विनंती केली आहे.

बिहार राज्य परिवहन सचिव संजयकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, बिहार राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राजधानीत एकूण 125 शहर सेवा बस चालवल्या जात आहेत. यामध्ये 70 सीएनजी बस आणि 14 इलेक्ट्रिक बस आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी या सर्व बसमध्ये महिला आणि मुलींसाठी बस सेवा पूर्णपणे मोफत असेल.

शहर बसमध्ये प्रवास करण्यासाठी, महिलांना मासिक पासमध्ये आधीच विशेष सवलत दिली जात आहे. यासह, सर्व बसमध्ये 65 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT