उत्तर प्रदेशमधील झाशीत मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र सामूहिक विवाह सोहळ्यात एक विवाह असाही झाला की या विवाहाने समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची पाचावरधारण बसली. सामूहिक विवाहाचं आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुलीचं लग्न वराऐवजी वधूच्या मेव्हण्याशी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब चर्चेत येताच खळबळ उडाली असून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची वाहने मुलीच्या घराकडे रवाना झाली खरं प्रकरण समोर आलं
मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नानंतर वधू लगेचच स्वतःच्या कपाळावरचं कुंकु पुसताना दिसत आहे. वधू आणि वराच्या हालचालीही संशयास्पद होत्या. याबाबत वर आणि वधूशी वेगवेगळं बोलावून विचारपूस केली असता त्यांनी याची कबूली दिली आहे. समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वधूचा मेहुणा लग्नाला तयार झाला आणि विधी पार पडले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
झाशी येथील खुशीचं लग्न मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बृषभानसोबत ठरलं होतं. सामूहिक पद्धतीने लग्न सभारंभ पार पडणार होता. या समारंभात खुशीचा नोंदणी क्रमांक 36 होता. त्याप्रमाणे खुशी आपल्या जागी येऊन उभी होती. मात्र बृषभान ऐनवेळी लग्नाला आला नाही. त्यामुळे मोठी पंचाईत झाली. समाज कल्याणच्या काही अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्यासाठी सोबत आलेल्या वधूच्या मेव्हण्याला लग्नासाठी तयार केलं आणि विधी पार पाडल्या. विझी पार पडल्यानंतर लगेचच वधूने आपल्या कपाळावरील कुंकु पुसून टाकलं. मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांची पाचावरधारण बसली.
समाजकल्याण अधिकारी ललिता यादव यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाने जोर धरल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी बामोर गावात धाव घेत चौकशीची केली असता वधूचा मेहुणा दिनेश लग्नात ब्रिषभानच्या जागी उभा राहून विधी पार पाडल्याचं समोर आलं. दरम्यान या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.