Delhi fire Saam TV Marathi
देश विदेश

Delhi fire : राजधानीत अग्नितांडव, ४ मजली इमारतीचा कोळसा, ४ जणांचा होरपळून मृत्यू

Delhi fire : दिल्लीतील मंगोल मार्केटजवळील चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. ग्राऊंड फ्लोअरवरील शू शॉपमध्ये लागलेली आग क्षणात इमारतीत पसरली.

Namdeo Kumbhar

Delhi four-storey building fire latest update : राजधानी दिल्लीमध्ये ४ मजली इमारतीला भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री सव्वा सहा वाजता आगीचा भडका उडाला. इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला असणार्‍या शू शॉपला आग लागली. ही आग क्षणात पूर्ण इमारतीमध्ये पसरली अन् जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत ४ जणांचा मृत्यू झालाय.

राजधानी दिल्लीच्या अग्निशामन दलाला रात्री ६.२७ वाजता इमारातीला आग लागल्याची घटना मिळाली. मंगल मार्केटजवळ एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळताच चार गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या. अग्निशामन दलाने अवघ्या काही तासात आग आटोक्यात आणली. इमारतीमधून ४ जणांचे मृतदेह अग्निशामन दलाने बाहेर काढले. एकजण गंभीर जखमी झालाय. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरला असणाऱ्या शू शॉपला आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशामन दलाकडून आगीचं कारण शोधण्यात येत आहे. पोलिसांकडून दुर्घटनेची नोंद करण्यात आली. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून तो मालक सतींदर उर्फ ​​जिमी (३८) आहे. सविस्तर तपास करण्यासाठी गुन्हे आणि फॉरेन्सिक पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वीच लागलेली आग

याआधी राजधानी दिल्लीमध्ये २६ नोव्हेंबर रोजी नारायणा औद्योगिक क्षेत्रातील एका चार मजली गोदामात भीषण आग लागली होती. पेंट्स अँड इलेक्ट्रिकल्स या गोदामात पहाटे २:१५ वाजता आग लागल्याची घटना घडली होती. स्थानिकांनी तात्काळ दिल्ली अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT