veer soren found dead Saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

veer soren found dead : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू झालाय. नातवाच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू

मनालीतील होमस्टेमध्ये आढळला मृतदेह

रुग्णालयात नेताना तोंडातून येत होता फेस

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या २२ वर्षीय नातवाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका बंद खोलीत सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला. खोलीतून तातडीने रुग्णालयात नेताना त्याच्या तोंडातून फेस येता होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. चंपई सोरेन यांच्या नातवाचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, याचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सोमवारी रुग्णालयातून माहिती मिळाली की, शासकीय रुग्णालयात एका पर्यटकाला मृत अवस्थेत आणलं आहे. रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांना प्राथमिक तपासात कळालं की, 'मृत तरुणाचे नाव हे वीर सोरेन त्याचे नाव आहे. तो चंपई सोरेन यांचा नातू आहे. तो मित्र अग्नय वर्मासोबत मनालीला फिरायला आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्नयने चौकशीत सांगितलं की, वीरसोबत २२ फेब्रुवारी रोजी मनालीला फिरायला आलो होतो.दोघे स्थानिक नागरिकांच्या 'होमस्टे'मध्ये थांबलो. दोघे २३ फेब्रुवारी रोजी सोलंग आणि सेथन येथे फिरायला गेलो. सायंकाळी पुन्हा 'होमस्टे'मध्ये आलो. सोमवारी होम स्टेजवळील भागात फिरून साडेबारा वाजता परतलो. वीर सोरेन 'होमस्टे'मध्ये आल्यावर झोपी गेला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोके दुखायला लागले. त्यामुळे त्याचासाठी ऑनलाइन औषध मागवलं. प्रकृती बिघडलेल्या वीरने औषध प्यायलं.

त्यानंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीतून मोठा आवाज आला. खोलीत गेल्यानंतर बघितलं तर वीर सोरेन बेडवरून खाली पडला होता. मी तातडीने गाडी बोलावली. त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात नेताना त्याच्या तोंडातून फेस येत होता. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.वीरचे कुटुंबीय मनालीला आल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदनानंतर वीरच्या मृत्यूचे कारण समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्षफुटीला 1999च्या पक्ष घटनेचा आधार; सुप्रीम कोर्टात शिंदेसेनेचा जोरदार युक्तीवाद

Thursday Horoscope : आज या राशींना मिळणार मोठी संधी! तुमची रास यात आहे का? वाचा एका क्लिकवर

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

SCROLL FOR NEXT