Supreme Court News Saamtv
देश विदेश

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

DY chandrachud latest News : ठाकरे गटाच्या आरोपांना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशाचे माजी मुख्य सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी ठाकरे गटाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आता एखादा पक्ष ठरवणार आहे का, कोणत्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घ्यावा, असा शब्दात माजी मुख्य सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या मनातील कायद्याची भीती संपुष्टात आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणावर याचिकेवर निर्णय न घेऊन आमदारांना पक्षांतर करण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवल्या आहेत, अशी टीक संजय राऊत यांन केली होती.

'एएनआय' वृत्त संस्थेला मुलाखत चंद्रचूड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 'माझं उत्तर सरळ आहे. मागील काही वर्षांत अनेक प्रकरणावर सुनावणी केली. आम्ही ९ न्यायाधीशांच्या पीठाचे निर्णय, ७ न्यायाधीशांचे पीठ, ५ न्यायाधीशांचे पीठांनी अनेक निर्णय दिले आहेत. आता एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टाच्या एका प्रकरणार काय निर्णय घ्यावा? मला माफ करा, हे सर्व अधिकार मुख्य सरन्यायाधीशांकडे असतात'.

चंद्रचूड पुढे म्हणाले, 'गेल्या २० वर्षांपासून अनेक प्रकरणे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. ते बोलत असतील, आम्ही जो वेळ दिला. त्यात एक मिनिटाचंही काम केलं नाही, तर ते म्हणू शकतात. सुप्रीम कोर्टात अनेक प्रकरणे मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता सुप्रीम कोर्ट जुन्या प्रकरणावर सुनावणी का करत नाही? आताच्या प्रकरणावर का सुनावणी करत आहे? तुम्ही एखाद्या विशेष प्रकरणावर सुनावणी का केली नाही? खरंतर आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. न्यायाधीशांची संख्या निश्चित आहे. यावेळी आम्हाला सुवर्णमध्य साधावा लागतो.

'राजकारणातील एक वर्ग मानतो की, आमच्या अंजेड्याचं पालन केलं तर आम्ही स्वातंत्र्य आहे. आम्ही अनेक निर्णय घेतले. ते काम कमी महत्वाचं होतं का? आम्ही अलीकडेच अलीगड मुस्लिम विद्यापीठाबाबत निर्णय घेतला. इलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाने मदरसे बंद करण्याचेही निर्णय घेण्यात आले. हे निर्णय महत्वाचे नव्हते का? असा सवाल चंद्रचूड यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT