foreigner viral video  viral video
देश विदेश

बाबो, भूत आलं रेssss... फॉरेनरला पाहून शाळेतली मुलं रडली अन् सैरावैरा धावत सुटली, व्हिडिओ व्हायरल

foreigner video : फॉरेनर खेडेगावातील एका शाळेत पोहचली अन् एकच गोंधळ उडाला. मुलं तिला पाहून धावत सुटली, काही मुलांना तर रडायचेही कळेना. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. मजेशीर व्हिडिओ इन्स्ट्रग्रामवर व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

foreigner instagram viral video : शाळेत एखादा पाहुणा, व्यक्ती आल्यानंतर मुलं उत्साहात असतात, स्वागत करतात. पण लाओसमध्ये उलट घडलं. फॉरेनरला शाळेत पाहिल्यानंतर मुलं घाबरली. काही मुलं रडायला लागली तर काही सैरावैरा धावत सुटली. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भोळ्या भाबड्या मुलांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. इन्स्टाग्रामवर या प्रसंगाचा व्हिडिओ पाहून अनेकजण कमेंट्स अन् प्रतिक्रिया देत आहेत.

एक फॉरेनर महिला फिरत फिरत लाओसमधील एका खेड्यातील शाळेत पोहचली. मुलांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी गेलेल्या फॉरेनला पाहून मुल घाबरली. काही मुलं दप्तर घेऊन शाळेतून पळत सुटली. तर काही डेस्कच्या खाली लपून बसले. काही मुलं भूत आलं रे भूत असे म्हणत शाळेच्या प्रांगणातून धावत सुटली. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. त्यावर मजेशीर कमेंट्स येत आहेत.

मुलांची निरागसता पाहून अनेकांना हसू आवरेना

व्हिडिओ पोस्ट करताना युजर्सने याबाबत एक पोस्टही लिहिली आहे. त्यात म्हटलेय, स्थानिकांच्या मते या भागात खूप कमी पर्यटक येतात. काही मुलांनी तर पहिल्यांदाच गोऱ्यागोमट्या आणि देखण्या पर्यटकाला पाहिलं होतं. त्यामुळे काही जणांना ती भूत असल्यासारखं वाटलं. त्या फॉरेनरला पाहून मुलं बेंच, खुर्चीच्या खाली लपून बसले. तर काही जण ब्लॅकबोर्डच्या पाठीमागेही लपले होते. काही मुलांनी पुस्तके अन् स्कूलबॅगला ढाल केले. घाबरलेल्या मुलाचे निरागस चेहरे पाहून सर्वजण चकीत झाले. अनेकांना हसूही आवरले नाही. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पाहा...

अन् व्हिडिओ झाला व्हायरल

infobazzarnet या इन्स्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्याला पाहून मुलांची झालेली अवस्था पाहून फॉरेनरला हसू आवरत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्या फॉरेनरने मुलांचा निरागसपणा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ इन्स्टावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय अन् सहा लाखांपेक्षा जास्त युजर्सनी लाईक्स केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: रुग्णालयात कुस्तीचा आखाडा! डॉक्टर आणि आशा वर्कर्सने एकमेकांना धू-धू धुतलं; VIDEO व्हायरल

Shahapur : शहापूर तालुक्यातील धरण ओव्हरफ्लो; मोठ्या प्रमाणात विसर्ग, गावांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्स रॅकेट उद्धवस्त; २.०४ कोटींचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Live News Update : पूरग्रस्तांना मदतीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने १ कोटी रुपयांचा निधी जाहीर

हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओढणीनं आयुष्याचा दोर कापला, सुसाईड नोटमधून कारण उघड

SCROLL FOR NEXT