Panipuri Shake Instagram/@foodie_blest
देश विदेश

आता हेच बघायचं राहील होतं! बाजारात आलाय 'पाणीपुरी शेक'; पहा हा Viral VIDEO

होय! आता बाजारात पाणीपुरीच्या शेक आलाय

वृत्तसंस्था

दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) विचित्र फूड कॉम्बिनेशनशी संबंधित व्हिडिओंची जणू लाटच आली आहे. रस्त्यावरील फास्ट फूड (Fast Food) विक्रेते एखाद्या चांगल्या खाद्यपदार्थांवर असे काहीही वाट्टेल ते मनाचे प्रयोग करत आहेत. काही देशात लज्जतदार पाककृती तयार करण्याची स्पर्धा सुरू आहे. कधी वडा पाव आईस्क्रीम रोलचा व्हिडिओ, तर कधी मॅगीसोबत मिरिंडा. आता ही पाणीपुरी (Panipuri)… यामुळे लोकांचे डोके चक्रावले आहे आणि पदार्थ ऐकून ते खाण्याची इच्छा मेलीय. (Panipuri Shake Viral Video)

याच प्रकारामध्ये सध्या व्हायरल होत असलेला पाणीपुरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण धक्क्यात असेल. एका माणसाने पाणीपुरी शेकचा (Panipuri Shake) शोध लावला आहे. हे पाहून लोक उलट्या होत असल्याचे कमेंट आहेत. व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे, की एक विक्रेता पाणीपुरीचा शेक बनवताना दिसत आहे. ही व्यक्ती आधी मिक्सरच्या भांड्यात काही पाणीपुरीच्या कोरड्या पुऱ्या टाकते. यानंतर, त्यात उकडलेले बटाट्याचे तुकडे, पाणीपुरीचे आंबट आणि गोड पाणी घालून त्याला मिक्सर मधून फिरवून घेते. आणि त्याच्या चांगला शेक तयार करते. यानंतर ते ग्लासमध्ये ओतून त्यावर पाणीपुरीच्या चुरा टाकून सजवते आणि सर्व्ह करते.

पहा पाणीपुरी शेक-

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर;

ही अजब रेसिपी पाहून काय कराव, काय रिऍक्ट व्हावे हे कळणार नाही. या विचित्र पाणीपुरी शेकचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर foodie_blest नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. एका यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘क्या लगता है, कैसा होगा?’ हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral Videos On Social Media)

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विक्रेत्यावर आपला प्रचंड राग काढत आहेत. एका यूझरने कमेंट करत लिहिले आहे की, उलटी होण्यासाठी पिशवी तुम्हीच द्याल की नाहीतर आम्हाला सोबत आणावी लागेल? त्याचवेळी दुसरा यूझर लिहितो, की हे पाहिल्यानंतर मला उलट्या झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT