Florida plane crash news : अमेरिकेच्या दक्षिण फ्लोरिडा भागात एक अत्यंत भीषण विमान अपघाताची घटना घडली आहे. रहिवासी भागात खासगी जेट विमान एखाद्या मिसाईलसारखं कोसळल्याने मोठा स्फोट झाला. या दुर्दैवी दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू (nine killed in Florida plane crash) झाला आहे. या घटनेचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (South Florida private jet crash)
दक्षिण फ्लोरिडापाम बीच काउंटीमधील (Palm Beach County aircraft accident) क्रेस्टहेवनजवळ हा अपघात घडला. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, विमान जवळच्या घरांवर आदळता आदळता थोडक्यात वाचले. अन्यथा आणखी काही लोकांचा जीव गेला असता. विमान एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळल्याने मोठा स्फोट झाला. अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये परिसरातील गोंधळाचे दृश्य दिसत आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्टिन-बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते जिम रेनॉल्ड्स यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, अपघातग्रस्त विमान एक खासगी जेट होते. ते टेक्सासमधील ऑस्टिन येथून बहामासला जात होते. पण हवेतच त्याचा अपघात झाला. पाम बीच काउंटी शेरीफ कार्यालयाच्या माहितीनुसार, हा अपघात मिलिटरी ट्रेलवर झाला. हा परिसर व्यस्त सहा-पदरी रस्त्यावरील अनेक खाद्य आणि पेय दुकाने असलेला एक गजबजलेला परिसर आहे. या दुर्घटनेमुळे खाली असणाऱ्या कुणालाही दुखापत झालेली नाही.
अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी दुर्घटनेत सर्व ९ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत सांगितले की, या घटनेत सर्व ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांची पथके अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. सध्या कारणांचा तपास सुरू आहे. दरम्यान, पाम बीच काउंटी फायर रेस्क्यूने अपघातानंतर या घटनेला 'मोठी जीवितहानी' म्हणून घोषित केले आहे.
अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फुटेजमध्ये विमान आकाशातून वेगाने खाली कोसळताना आणि जमिनीवर आदळताच मोठ्या आवाजासह स्फोट होताना दिसत आहे. अपघातानंतर घटनास्थळावर काळ्या धुराचे लोट पसरले आणि उद्ध्वस्त झालेल्या रस्त्याच्या आजूबाजूला आगीच्या ज्वाला भडकलेल्य दिसत आहेत. निवासी घरांपासून केवळ काही मीटर अंतरावर विमान कोसळल्याने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.