फ्लाईट अटेंडंटचा बुर्ज खलिफावर जीवघेणा स्टंट: पहा व्हिडीओ 
देश विदेश

फ्लाईट अटेंडंटचा बुर्ज खलिफावर जीवघेणा स्टंट: पहा व्हिडीओ

लाल टोपी आणि एअरलाइन ड्रेस परिधान केलेली फ्लाइट अटेंडंट महिला 828 मीटर उंची असलेल्या बुर्ज खलिफाच्या शीर्षस्थानी उभी असल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था

दुबईच्या (Dubai) अमीरात विमान कंपनीची जाहिरात आजकाल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडीओ जाहिरातीत, अमिरात एअरलाइंन्सची (Emirates Airlines) एक महिला फ्लाइट अटेंडंट बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) प्लेकार्डद्वारे विमान कंपनीची वैशिष्ट्ये सांगताना दिसत आहे. या दरम्यान, ती फलकांवर लिहिलेले वेगवेगळे संदेश दाखवत आहे. शेवटच्या प्लेकार्डवर लिहिलेला संदेश दाखवल्यानंतर कॅमेरा झूम करून बाहेर पडतो आणि या दरम्यान फ्लाइट अटेंडंट जगातील सर्वात उंच आणि 828 मीटर उंच बुर्ज खलिफावर उभे असल्याचे दिसून येते. (Flight attendant's deadly stunt on Burj Khalifa: Watch the video)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी स्पेशल इफेक्ट आणि ग्रीन स्क्रीन वापरून हा व्हिडीओ तयार केल्याचे म्हटले आहे. मात्र अमिरात एअरलाईन्सनेदेखील सोशल मिडीया युजर्सला स्पेशल इफेक्ट आणि ग्रीन स्क्रीनचा वापर न करता शूट केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जगातील सर्वात मोठी विमान कंपनी आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) ची फ्लॅग कॅरियर अमिरात एअरलाईनने ही जाहिरात कशी तयार केली, याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

व्यावसायिक स्कायडायव्हिंग प्रशिक्षक निकोल स्मिथ-लुडविकही (Nicole Smith Ludvik) या जाहिरातीत दिसत आहेत. कॅमेराचे फोकस झूम होताच, लाल टोपी आणि एअरलाइन ड्रेस परिधान केलेली फ्लाइट अटेंडंट महिला 828 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या शीर्षस्थानी उभी आहे. फ्लाइट अटेंडंटजवळ फक्त 1.2-मीटर स्टँड होता," एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे. ही सर्वात जास्त उंचीवर केलेली जाहिरात आहे.

बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे

बुर्ज खलिफाच्या 160 च्या पातळीवरून चढण्यास 1 तास 15 मिनिटे लागली. इमारतीच्या टोकाला जाण्यासाठी एअरलाईन्सच्या पथकाला अनेक मजले पार करावे लागले. संपूर्ण सीन चित्रित करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. त्याचे बांधकाम 21 सप्टेंबर 2004 रोजी सुरू झाले आणि त्याचे अधिकृत उद्घाटन 4 जानेवारी 2010 रोजी झाले. इमारतीच्या बांधकामात 1,10,000 टनांपेक्षा जास्त काँक्रीट, 55,000 टनांपेक्षा जास्त स्टील रिबारचा वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या बांधकामात दररोज सुमारे 12,000 मजूर काम करत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT