Terrorist Attack ANI
देश विदेश

Terrorist Attack: पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला; ५ चिनी इंजिनिअर्सचा मृत्यू

Terrorist Attack : मंगळवारी उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये चीनचे इंजिनिअर्स असलेल्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. यात त्यांच्या पाकिस्तानी ड्रायव्हरसह ५ चिनी नागरिकांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

Five Chinese Engineers Killed In Pakistan :

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना घडलीय. खैबर पख्तूनख्वामधील शांगला जिल्ह्यात हा हल्ला झाला. यात चीनच्या ५ इंजिनिअर्सचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या नागरिकांना लक्ष्य करत हा आत्मघातकी हल्ला केला गेल्याचं सांगितलं जात आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे चिनी इंजिनिअर्स इस्लामाबादहून खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दासू येथील कॅम्पकडे जात होते, त्यावेळी हल्ला करण्यात आला. (Latest News)

खैबर पख्तुनख्वाच्या शांगलाच्या बिशाम तहसीलमध्ये स्फोटकं भरलेल्या कारने एका दुसऱ्या वाहनाला धडक दिली, त्यानंतर स्फोट झाला. यात ५ चिनी लोकांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार,धडक दिलेल्या वाहनामध्ये चिनी नागरिक होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याच दहशतवादी गटाने घेतली नाहीये. तसेच चीनकडूनही याप्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नसल्याची माहिती मोहम्मद अली गंदापूर येथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.

दरम्यान दासू येथे बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या प्रकल्पावर दहशतवादी हल्ला होण्याची पहिली वेळ नाहीये.गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर हल्ले वाढलेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक हल्ले खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागात झाले आहेत. बलुचिस्तानमधील स्थानिक जनता पाकिस्तान सरकारच्या विरोधात असूनही चीनने येथे मोठी गुंतवणूक केलीय. २०२१ मध्ये येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यात एका बसमध्ये स्फोट करण्यात आला होता. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसापूर्वी बलुचिस्तान प्रांतातील पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल तळावर दहशतवादी हल्ला झाला.त्यानंतर हा आत्मघातकी हल्ला झालाय.नौदल तळावर हल्ला करण्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली होती. नौदल तळावर विस्फोट आणि गोळीबार केला गेला होता त्यात एक निमलष्करी सैनिकाचा मृत्यू झाला होता. पाकिस्तान लष्कराने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत सर्व ५ हल्लेखोर ठार केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT