BJP leader Chetan Tiwari, who was injured being shot. saam tv
देश विदेश

Firing in Lucknow: भाजपच्या नेत्यावर अंदाधुंद गोळीबार; पोलीस स्टेशनजवळ घडलेल्या रक्तरंजित थरारानं लखनौ हादरलं

Firing On BJYM Leader In Lucknow: शनिवारी रात्री लखनौमध्ये पोलीस ठाण्यापासून काही पावलांच्या अंतरावर समाजकंटकांनी एका BJYM नेत्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी त्याच्या कमरेला लागली.

Bharat Jadhav

  • लखनौमध्ये भाजयुमो नेत्यावर उघडपणे गोळीबार करण्यात आला.

  • चेतन तिवारी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या.

  • पोलीस स्टेशनजवळच घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

उत्तर प्रदेशातील लखनौमधून एक खळबळजनक घटना घडली आहे. शनिवारी रात्री टिकैतराय तलाव पोलीस ठाण्यापासून काही पावलांवरच निर्भय समाजकंटकांनी भाजप युवा मोर्चाचे नेते महाराज चेतन तिवारी उर्फ ​​श्याम चेतन यांच्यावर गोळीबार केला. समाजकंटकांनी चेतनवर तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक त्यांच्या कमरेत लागली.

रक्तबंबाळ झालेले श्याम चेतन रस्त्यावर कोसळले. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गोळीबारचा आवाज ऐकला, त्यानंतर जमिनीवर श्याम चेतन यांना पडलेलं पाहिलं. क्षणाचा विलंब न करता नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रक्तबंबाळ झालेल्या महाराज चेतन यांना त्यांनी तात्काळ केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जुन्या वैमनस्यातून आणि पोस्टर लावण्यावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी बाजारखाला पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले अशून त्यांची चौकशी केली जातेय. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत. सुरेश चंद्र तिवारी आपल्या कुटुंबासह मेहंदीगंज परिसरात राहतात. त्यांचा मुलगा, श्याम चेतन तिवारी, त्यांच्या घरासमोर बांधकाम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री श्याम चेतन गवंडीकडून विटा बसवून घेत होते. त्याचवेळी शेजारी राहणारा वैभव बाजपेयी आपल्या मित्रासोबत तिथे आला. त्यांच्यात वाद झाला. याचदरम्यान आरोपींनी श्याम चेतनवर गोळीबार केला. एक गोळी श्याम चेतनच्या कमरेत लागली. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले आणि जमिनीवर कोसळले. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी घटनास्थळी धावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लग्नातील डीजे बंद केल्याच्या वादातून औरंगपुरात तुफान राडा

Drishyam 3 : अखेर २ ऑक्टोबरचं रहस्य २१ मे ला उलगडणार; 'दृश्यम ३' येतोय, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला धमाकेदार सुरूवात

Mango Eating Tips: जेवल्यानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Gavhachi Khichdi Recipe: जेवणासाठी काहीतरी झटपट आणि पौष्टीक खायचंय? बनवा गरमागरम गव्हाची खिचडी, वाचा रेसिपी

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली अन् पुढच्या मिनिटाला ३ मोठ्या निर्णयांवर सह्या, थलपती विजय ठरले 'नायक'

SCROLL FOR NEXT