America Donald Trump Latest News  Saam TV
देश विदेश

Donald Trump : मोठी बातमी! अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; घटनेचा थरारक VIDEO समोर

America Donald Trump Latest News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satish Daud

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित रॅलीला संबोधित एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केलाय. सुदैवाने या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले आहेत. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अमेरिकेत सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत.

शनिवारी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प एका प्रचार रॅलीला संबोधित करत होते. या रॅलीला हजारो अमेरिकन नागरिकांची उपस्थिती होती. त्याचवेळी अचानक गोळीबाराचा आवाज झाला. यानंतर मोठी आरडाओरड सुरू झाली. सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना तातडीने सुरक्षास्थळी नेले.

जेव्हा ट्रम्प यांना मंचावरून खाली आणले जात होते. तेव्हा त्यांच्या कानामागून रक्त येत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याचे अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाने म्हटले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सर्व संरक्षणात्मक उपाय आजूबाजूला लागू करण्यात आले आहेत.

ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या या घटनेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी निषेश व्यक्त केला आहे. त्यांनी X वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसाचाराला अजिबात स्थान नाही. आम्हाला अद्याप नेमके काय झाले हे माहित नसले तरी, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुदैवाने सुखरुप आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो, असं ओबामा यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT