Mahakumbh Fire Update Saam tv
देश विदेश

Mahakumbh Fire Update : महाकुंभमेळ्यात अग्नितांडव सुरुच; अनेक तंबू जळून खाक, परिसरात खळबळ

Mahakumbh Fire Update in Marathi : महाकुंभमेळ्यात अग्नितांडव सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. या आगीत तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

महाकुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनात खळबळ उडाली. महाकुंभमेळ्यातील लवकुश धाम तंबूंना आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. महाकुंभमेळ्यात वारंवार आग लागल्याच्या घटना घडू लागल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

महाकुंभमेळ्यातील प्रयागराज मेळ्यात पुन्हा आगीची घटना घडली आहे. महाकुंभ मेळ्यातील सेक्टर १८ आणि १८ दरम्यान असणाऱ्या अनेक तंबूंना अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रशासनाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

महाकुंभमेळ्यात तिसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. याआधी ९ फेब्रुवारीला रात्री २३ सेक्टरला आग लागल्याची घटना घडली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. गॅस सिलिंडर लीक झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली होती. आगीच्या घटनेनंतर भाविकांचा धावाधाव पाहायला मिळाली होती.

महाकुंभमेळ्यात ३० जानेवारी रोजी देखील आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी १२ हून अधिक तंबू जळून खाक झाले होते. खासगी कंपन्यांनी लावण्यात आलेल्या तंबूंना आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. महाकुंभमेळ्यातील तंबूंना गॅस सिलिंडर लिक होऊ लागल्याने आग लागत असल्याचे कारण समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Okra Water Benefits: सलग ६ महिने भेंडीचे पाणी प्या, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT