Adani Group Latest News: हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या 5 दिवसांत अदानी एंटरप्रायझेसच्या तिकीटात 49.60 टक्के घट झाली आहे. या प्रकरणावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती.
परंतु आज त्यांनी पहिल्यांदाच मौन तोडले आहे. अर्थमंत्र्यांनी एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणी एसबीआय आणि एलआयसीने निवेदन जारी केले असल्याचे म्हटले आहे.
मर्यादित एक्सपोजर
एसबीआय आणि एलआयसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, अदानी समूहाचे एक्सपोजर त्यांच्यापुरते मर्यादित आहे. यासोबतच त्यांनी मार्केट रेगुलेटर्सचेही कौतुक केले आहे. सीतारामन यांच्या प्रतिक्रियेनुसार, अदानी समूहाचे एक्सपोजर मर्यादेत आहे आणि व्हॅल्यूएशनमधअये घसरण होऊनही ते अजूनही नफ्यात आहेत.
दरम्यान एलआयसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या कर्ज आणि इक्विटीमध्ये 36,474.78 कोटी रुपयांची गुंतवणूकीचा खुलासा झाला आहे. तसेच ही रक्कम त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ एक टक्का असल्याचे सांगण्यात आले आहे.
आदानी प्रकरणावर केंद्र सरकार काय म्हणाले?
अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये आदानी समुहावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांवर आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले होते. परंतु आज केंद्र सरकारने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे मोदी सरकारने आदानी समूहावरील आरोपांच्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवल्याचे दिसत आहे.
मार्केट कॅप 120 अब्ज डॉलररने कमी झाली
हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या अहवालानंतर अदानी समूहाच्या लिस्टेड 7 कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपच्या निम्म्याहून अधिक नुकसान केले आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप 120 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त घसरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.