Girl Fight Viral Video Saam TV
देश विदेश

Girls Fight : मॉलबाहेर तरुणींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींवर पार तुटून पडल्या लोकं फक्त बघत राहिली

या व्हिडीओत मॉलबाहेरच चार तरुणी एकमेकींना मारहाण करताना दिसून येत आहे.

Satish Daud

Girls Fight Viral Video : जेव्हा महिला एकमेकींवर प्रेम करतात, तेव्हा ते मनापासून करतात, पण जेव्हा त्यांच्यात वाद होतात, तेव्हा ते अनेकदा टोकाला जातात. काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मॉलबाहेरच चार तरुणी एकमेकींना मारहाण करताना दिसून येत आहे. (Latest Marathi News)

भररस्त्यात या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दीही जमली असून उपस्थितांनी याचा व्हिडीओ  (Viral Video)  रेकॉर्ड केला आहे. या तरुणींनी एकमेकींना केस ओढून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल झालेला व्हिडीओ एक मॉलबाहेरील आहे. प्राप्त माहितीनुसार, या तरुणींमध्ये एका तरुणावर हाणामारी (Crime News) झाली आहे. यातील दोन तरुणी त्यांच्या मित्रासोबत मॉलमध्ये फिरायला आल्या होत्या. या मॉलमध्ये आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत फिरताना बघून यातील एका तरुणीची चांगलीच सटकली.

तिने या तरुणीला आपल्या प्रियकरासोबत का फिरते आहे, असा जाब विचारला. याच कारणामुळे दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली. सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून त्यांना मॉलबाहेर काढलं. मात्र, मॉलच्या बाहेर आल्यानंतरही या तरुणींनी भररस्त्यात एकमेकींना मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ 'घर के कलेश' या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा या चार तरुणी एकमेकांना मारहाण करत होत्या. तेव्हा प्रियकराने मात्र, कुठलाही रिस्क न घेता, तेथून पळ काढला. या तरुणांना मारहाण करतांना बघून रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यातील काही जण या फ्री स्टाईल हाणामारीचा आनंदही घेत होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

शिंदेसेनेचं महापौरपदासाठी ऑपरेशन टायगर? ठाकरेसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडणार?

Maharashtra News Live Update: अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना दुर्दैवी,दोषींवर कारवाई होणारच: बावनकुळे

SCROLL FOR NEXT