Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: वडिलांनी मोबाईल हिसकावला; रागाच्या भरात 'तो' १७ व्या मजल्यावर लटकला अन् थेट... थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकजण तो आणि शेअरही करत आहेत....

Gangappa Pujari

Singapore: सध्या अल्पवयीन, शाळकरी मुलांना लागलेल मोबाईलचे वेड चिंतेचा विषय ठरत आहे. २४ तास इंटरनेटवर ही मुले वेळ घालवताना दिसतात. सतत मुलांना हातात मोबाईल हवा असतो. खाताना, पिताना नेहमीच ही मुले मोबाईलवर व्यस्त असल्याचे दिसतात. मात्र मोबाईलच्या या वेडाचे असंख्य दुष्परिणामही समोर येतात.

सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वडिलांनी मोबाईल हिसकावल्याने मुलाने अस काही कृत्य केले. जो पाहून अंगावर काटा उभा राहिलं. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. (Viral Video)

समोर आलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ सिंगापूमधील आहे. वडिलांनी मोबाईल हिसकावल्याने हा मुलगा रागावतो. आणि रागाच्या भरात तो इमारतीच्या १७ व्या मजल्यावर धोकादायक ठिकाणी उभा राहतो. इतकेच नव्हेतर तो त्याच्या कुटूंबियांना मोबाईल, आयपॅड देण्यासाठी धमकी देत असल्याचे दिसत आहे. परंतु तो उभा असलेल्या ठिकाणावरुन त्याचा हात निसटतो आणि थेट खाली कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मुलगा त्या धोकादायक ठिकाणी उभा असतानाच त्याचे पालक तात्काळ पोलिसांना याबद्दलची माहिती देतात. त्यामुळे पोलिस घटनास्थळी धाव घेतात. त्यामुळे तो पडण्याआधीच पोलिस इमारतीखाली त्याच्या मदतीसाठी मोठी गादीसारखे प्लॅस्टीकचे कुशम पसरतात. त्याचवेळी मुलाचा हात सुटतो आणि तो खालच्या गादीवर पडतो.

पोलिसांच्या मदतीने आणि पालकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या मुलाला कोणतीही इजा होत नाही. तो थेट १७ व्या मजल्यावरुन त्या गादीवर सुखरुपपणे कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकजण तो आणि शेअरही करत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. ज्यामध्ये अनेकांनी मुलांच्या या हट्टाविषयी चिंता व्यक्त केली आहे, तर काही जणांनी या परिस्थितीला पालकच जबाबदार असल्याचे म्हणले आहे. तसेच अनेकांनी पोलिसांच्या तत्परतेचेही कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT