Beed Crime News Saam tv
देश विदेश

Father Cut Teacher Finger: मुलीला शाळा साफ करायला सांगितल्याने वडिलांचा संताप; कडाडून चावा घेत शिक्षकाचं बोट तोडलं

Crime News: शाळेत घडलेला प्रकार विद्यार्थिनीने आपल्या घरी बाबांना सांगितला.

Ruchika Jadhav

Madhya Pradesh News: मध्यप्रदेशमध्ये गुन्हेगारी विश्वात सतत्याने वाढ होत आहे. माणसांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा रागाच्याभरात व्यक्तीच्या हातून मोठ्या चूका होण्याची शक्यता असते. उत्तरप्रदेशच्या रीवा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. आपल्या मुलीला शाळेत साफसफाई करायला सांगितल्याने वडलांनी शिक्षकाच्या बोटाचा चावा घेत बोट तोडलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय जगन्नाथ साहू असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुलीच्या वडलांना अटक केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शिक्षकावर देखील कारावाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पोलीस स्टेशबाहेर आंदोलन देखील केलं.

नेमकं काय घडलं?

इयत्ता ७वीमध्ये शिकत असलेल्या या विद्यार्थिनीला शिक्षकाने साफसफाई करण्यास सांगितली होती. मात्र तिने सफाईसाठी नकार दिला. त्यामुळे शिक्षकाने तिला मारहाण केली. शाळेत घडलेला प्रकार विद्यार्थिनीने आपल्या घरी बाबांना सांगितला. हे सर्व ऐकून बाबांना फार राग आला. त्यामुळे मुलीच्या वडलांनी तातडीने शाळेत धाव घेतली.

माझ्या मुलीला का मारलं याचा जाब विचारत असताना दोघांमध्येही भांडणं सुरू झाली. काही वेळातच ही भांडणे हाणामारीत बदलली. यामध्ये मुलीच्या वडलांनी शिक्षकाच्या बोटाचा कडाडून चावा घेतला. यात शिक्षकाच्या बोटाचा काही भाग तुटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT