Farrukhabad Coaching Class Explosion saam tv
देश विदेश

Coaching Class Explosion: कोचिंग क्लासमध्ये भीषण स्फोट, २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती गंभीर

Farrukhabad Coaching Class Explosion : उत्तर प्रदेशात फर्रूखाबाद जिल्ह्यात शनिवारी एक भीषण घटना घडली. शहरातील एका कोचिंग सेंटरमध्ये स्फोट झाला. त्यात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

  • कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट

  • उत्तर प्रदेशातील फर्रूखाबादमधील घटना

  • २ किलोमीटरपर्यंतचा परिसरात स्फोटाने हादरला

  • २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील फर्रूखाबाद जिल्ह्यात भयंकर घटना घडली. शहरातील एका कोचिंग सेंटरमध्ये शनिवारी भीषण स्फोट झाला. स्फोटाचं कारण समजू शकलेलं नाही. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

स्फोटाची तीव्रता अधिक होती. स्फोटाच्या आवाजानं परिसर हादरला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस पथकाकडून घटनेची माहिती घेतली.

कादरीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनपूर मंडी रोडवर एक कोचिंग सेंटर आहे. या सेंटरमध्ये शनिवारी संध्याकाळी अचानक मोठा स्फोट झाला. सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. स्फोटाच्या आवाजानं आजूबाजूचा परिसर हादरला. नागरिक भयभीत झाले होते. तिथल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कोचिंग सेंटरमध्ये काही विद्यार्थी जखमी अवस्थेत पडले होते. या घटनेची माहिती कादरीगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली.

काही स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. ते घटनास्थळी पोहोचले. आठ विद्यार्थ्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सहा जणांनी प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. काही विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना सैफई मेडिकल कॉलेजला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. जवळपास दोन किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज आल्याचे काही स्थानिकांनी सांगितले.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सेफ्टिक टँकमध्ये अधिक प्रमाणात गॅस असल्यानं हा स्फोट झाल्याचं कारण समोर आले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली असता, मीथेन गॅसमुळे हा स्फोट झाला. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कोचिंग सेंटरमधील सर्व रेकॉर्ड तपासण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railway: भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, येथून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासाठी ट्रेन जातात

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची खड्ड्यांवरून केडीएमसी प्रशासनाला चपराक व्हिडिओ व्हायरल

Floods: पावसाचा हाहाकार! एअरपोर्ट, शाळा- कार्यालयासह रस्तेही ब्लॉक, नेपाळमध्ये २४ तासापासून मुसळधार

Dahisar Police : चेन स्नॅचिंग प्रकरणात सराईत चोरटा गजाआड, दहिसर पोलिसांनी मध्यप्रदेशमधून केली अटक

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान |VIDEO

SCROLL FOR NEXT