raju shetti saam tv
देश विदेश

Lok Sabha Election: राजू शेट्टी महाविकास आघाडीला साथ देणार? 'स्वाभिमानी'ला किती जागा मिळणार?

Raju Shetti News In Marathi: इंडिया आघाडीच्या बैठकीतून राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत येणार असल्याची माहिती मिळत आहे. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत १ जागा मिळण्याची शक्यता आहे,

Vishal Gangurde

प्रमोद जगताप, नवी दिल्ली

Raju Shetti News:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. 'इंडिया आघाडी'च्या घटक पक्षांची दिल्लीत लोकसभेच्या जागावाटपावर खलबतं सुरु आहेत. या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी दिल्लीत बैठकीला हजेरी लावली आहे. याचदरम्यान, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत येणार असल्याची माहिती बैठकीतून मिळत आहे. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीसाठी १ जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया आघाडी'च्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक सुरु आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची जागावाटपावर चर्चा सुरु आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीतून राजू शेट्टी हे महाविकास आघाडीला साथ देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातून शेट्टी यांना हातकनंगलेची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या जागेवरून राजू शेट्टी यांची आघाडीत येण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजू शेट्टी आघाडीत येणार असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फार्महाऊसवर सुरू होती ड्रग पार्टी; माजी आमदार निघाला कोकिन टेस्ट पॉझिटिव्ह, राजकीय वर्तुळात खळबळ

Assembly Election: ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी, ४०हजार मतमोजणी अधिकारी...; कशा पार पडतील ५ राज्यांमधील निवडणुका?

Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Baramati Election : महाराष्ट्रात विधानसभेच्या २ जागांसाठी निवडणुका जाहीर, मतदान कधी? निकालाची तारीख स्पष्ट

Maharashtra Live News Update: भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

SCROLL FOR NEXT