Ravindra Waikar Face ED: ईडीकडून तब्बल १२ तासांपासून रविंद्र वायकरांची चौकशी, 500 कोटींच्या गैरव्यवहाराचे सोमय्यांनी केलेत आरोप

Ravindra Waikar Face ED: मागील बारा तासापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू आहे. आज सकाळी साडेआठ वाजले पासून ईडीचे 12 अधिकारी वायकर यांच्या निवासस्थानी कागद पत्रांची तपासणी करत आहेत.
Ravindra Waikar Face ED
Ravindra Waikar Face EDSaam Digital
Published On

Ravindra Waikar Face ED

मागील बारा तासापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू आहे. आज सकाळी साडेआठ वाजले पासून ईडीचे 12 अधिकारी वायकर यांच्या निवासस्थानी कागद पत्रांची तपासणी करत आहेत. जोगेश्वरी पूर्वेकडील मनोरंजनासाठी आरक्षित असलेल्या जागेवर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यासाठी पालिकेकडून परवानगी घेतली. यात सुमारे 500 कोटीचा गैरव्यवहार मनी लॉन्ड्रीग झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

वायकर आणि त्यांचे चार व्यावसायिक भागीदार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2023 मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यानंतर ईडीने नोव्हेंबर 2023 मध्ये एसीआर दाखल केला होता. त्यानंतर आज सकाळी येडीचे बारा अधिकारी या ठिकाणी येऊन कागदपत्रांची पाहणी करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ravindra Waikar Face ED
Lonar World Heritage: लोणार जागतिक हेरिटेज, विदेशी पर्यटक येतात, सुविधांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

नोव्हेंबर २०२३ मध्ये रवींद्र वायकर यांच्यासह सहा जणांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला होता. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपाखाली वायकरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हायाबाबत अद्याप कोणालाही समन्स करण्यात आले नाही. मात्र आज या प्रकरणातील सर्व व्यवसायिक आणि रविंद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. उद्या शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. निकालाच्या आदल्या दिवशीच ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

Ravindra Waikar Face ED
Parbhani: लंघुशंकेसाठी विहिरीजवळ गेले अन् तोल गेला; ६५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com