देश विदेश

प्रसिद्ध रेस्टॉरंटचा मालक कर्जात बुडाला, नैराश्यात घेतला टोकाचा निर्णय

Shocking : कर्जात बुडालेल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या मालकाने आत्महत्या केली. मालकाने आत्महत्या केल्याने हॉटेल इंड्रस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

रांचीतील प्रसिद्ध रेस्टॉरंट मालक शंकर नारायण यांनी घेतला टोकाचा निर्णय

शंकर नारायण अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय रेस्टॉरंट चालवत होते

पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय

झारखंडची राजधानी रांची येथील प्रसिद्ध रेस्टॉरंट मालकाने रविवारी सकाळी आयुष्य संपवलं आहे. ६९ वर्षीय रेस्टॉरंट मालकाने आत्महत्या केल्याने रांचीमध्ये खळबळ उडाली आहे. शंकर नारायण पी. बद्री असे आत्महत्या केलेल्या मालकाचे नाव आहे. मूळचे केरळचे असलेले बद्री हे कुटुंबसोबत कांके पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर नारायण यांनी घरातील एका खोलीत आयुष्य संपवलं. कर्जात बुडाल्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दक्षिण भारतीय रेस्टॉरंट चालवत होते. कांके भागात हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे. मात्र, याच रेस्टॉरंटचे मालक कर्जात बुडाले होते. त्यांच्यावर नेमकं किती कर्ज होतं, याची माहिती समोर आलेली नाही.

पोलीस हे रेस्टॉरंट मालकाच्या आत्महत्येचे कारण शोधत आहेत. त्यांच्या आत्महत्येची नोंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या रेस्टॉरंटचे मालक शंकर नारायण यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थेत पाठवला.

किरकोळ कारणातून एकाला संपवलं

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या हडिया येथे मद्य पिताना झालेल्या किरकोळ कारणातून एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतलं आहे. हत्या केलेल्या व्यक्तीचा बाजारात सापडला. मुकरू देवगम असे हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती हाती आली आहे.

आत्महत्या केलेला रेस्टॉरंट मालकाचे नाव काय?

शंकर नारायण पी. बद्र हे रांचीतील प्रसिद्ध दक्षिण भारतीय रेस्टॉरंटचे मालक होते.

मालकाच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण काय समोर आलं?

 रेस्टॉरंटचे मालक कर्जात बुडाले होते. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात आढळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain After Marriage: लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे नेमकी काय?

Breast growth stages: स्तनांची वाढ नेमकी कधी थांबते?; प्रत्येक महिलेला माहिती असायलाच हवं, जाणून घ्या तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Rahul Shewale : राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून मतदारांना साडी वाटप? संतप्त महिलांनी जाळून टाकल्या; पाहा VIDEO

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्यामागे ११,००० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Live News Update: चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावर दगडफेक

SCROLL FOR NEXT