Brazilian Singer Saam Digital
देश विदेश

Brazilian Singer: धक्कादायक! प्रसिद्ध गायकाचा कोळी चावल्यामुळे मृत्यू... जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार?

Brazilian Singer: ब्राझिलचा प्रसिद्ध गायक डार्लिन मोराइसचा चेहऱ्यावर कोळी चावल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या मुलीलाही कोळी चावला होता मात्र तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Brazilian Singer

ब्राझिलचा प्रसिद्ध गायक डार्लिन मोराइसचा चेहऱ्यावर कोळी चावल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या मुलीलाही कोळी चावला होता मात्र तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान घटनेमुळे ब्राझिलमध्ये खळबळ माजली आहे. तो २८ वर्षांचा होता.

कोळी चावल्यानंतर मोराइसच्या चेहऱ्यावर लगेचच काळ्या जखमा दिसायला लागल्या. सुरुवातीला कोणतरी अॅलर्जी असल्याची शंका होती. मात्र अधिकच थकवा जाणवल्यामुळे त्याची पत्नी झुलेनी लिस्बोआला त्याची काळजी वाटली. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर शुक्रवारी घरीही सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा थकवा जाणवू लागल्यामुळे रविवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पत्नी झुलेनी लिस्बोआ हिने 'जी १' शी बोलताना ही माहिती दिली आहे.

डार्लिन मोराइसने १५ व्या वर्षी फोरोमधून संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा भाऊ, मित्र या तिघांचे मिळून एक बँडही होते. टोकँटिन्स, गोयास, मारनहाओ येथे तो नियमित बँड सादर करत असे.

दरम्यान मोराइसच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर एक भावनीक पोस्ट शेअर केली आहे. अशा दुःखाच्या प्रसंगी दिलेल्या आधाराबद्दल खूप खूप आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: मिशन BGT साठी टीम इंडियाने कंबर कसली! सिक्रेट सरावाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Pankaja Munde: जेवढी लीड मिळेल तेवढ्या किंमतीचे गिफ्ट हवं, लाडक्या बहिणीची धनंजय मुंडेंकडे मागणी

Children's Day Special: या बालदिनी मुलांसाठी तयार करा स्वादिष्ट पिझ्झा, जाणून घ्या रेसिपी

Dhule Accident : भीषण अपघात...बस- दुचाकीची धडक; दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू, बस पूर्ण जळून खाक

Success Story: कोचिंग क्लासशिवाय UPSC क्रॅक, फक्त २१ व्या वर्षी IFS अधिकारी, विदुषी सिंग यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT