Fake Universities In India Saam TV
देश विदेश

Fake Universities: देशातील २१ विद्यापीठे बनावट! दिल्ली पहिल्या क्रमांकावर; UGC ने जाहीर केली बनावट विद्यापीठांची यादी

Fake Universities In India: धक्कादायक बाब म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सर्वाधिक बनावट विद्यापीठे असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी- UCG) ने २१ विद्यापीठे बनावट घोषित केली आहेत, जी पदवी देऊ शकत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सर्वाधिक बनावट विद्यापीठे (Fake Universities) असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. बनावट विद्यापीठांबाबत University Grants Commission - UGC ने जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये, विद्यार्थी आणि सामान्य जनतेला कळवण्यात आले आहे की, देशाच्या विविध भागांमध्ये २१ स्वायत्त, मान्यता नसलेल्या संस्था कार्यरत आहेत ज्या, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 चे उल्लंघन करत आहेत. (Fake Universities In India)

हे देखील पाहा -

यांपैकी सर्वाधिक दिल्लीत 8, उत्तर प्रदेशात 4, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 2 आणि कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक असे एकूण २१ बनावट विद्यापीठे असल्याचं यूजीसीने सांगितलं आहे. सार्वजनिक सूचनेनुसार, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 च्या कलम 22(1) नुसार, केवळ केंद्रीय, राज्य, प्रांतीय कायद्यांतर्गत स्थापन झालेली विद्यापीठे किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कलम 3 अंतर्गत स्थापन झालेली डीम्ड विद्यापीठे पदवी देऊ शकतात. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कलम 23 नुसार याव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेद्वारे 'विद्यापीठ' हा शब्द वापरण्यास मनाई आहे, त्यामुळे या ही २१ विद्यापीठं बनावट ठरली आहेत.

दिल्लीतील बनावट विद्यापीठांची यादी

1-ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फिजिकल हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी

2-कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड

3- यूनायटेड नेशन्स विद्यापीठ

4- वॉकेशनल विद्यापीठ

5- एडीआर सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी

6-इंडियन इंस्टीट्यूट आफ सायन्स अॅंन्ड इंजीनियरिंग

7- विश्वकर्मा ओपन यूनिवर्सिटी फार सेल्फ एम्प्लायमेंट इंडिया

8-आध्यात्मिक विद्यापीठ

यूपीमधील या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नका

1- गांधी हिंदी विद्यापीठ प्रयाग

2- नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी कानपूर

3- नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ अलीगढ

4- भारतीय शिक्षण परिषद फैजाबाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT