रियाज गौहर शाही यांची जुनी जगाच्या अंताची भविष्यवाणी
धूमकेतू पृथ्वीवर आदळून संपूर्ण मानवजातीचा विनाश होईल, असा शाहींचा दावा
नासा आणि अंतराळ संस्थांनी दावे फेटाळले
जगाचा अंत होणार असल्याचा अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्रत्येक महिनाभरात या प्रकारच्या भविष्यवाणी व्हायरल होतात. त्यावरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होते. आता पाकिस्तानच्या प्रसिद्ध गूढवाद आणि अध्यात्मिक गुरु रियाज अहमद गौहर शाही यांची एक जुनी भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. एक प्रचंड आणि विनाशकारी धूमकेतू पृथ्वीवर आदळेल, त्यामुळे संपूर्ण मानवी संस्कृती आणि सर्व सजीव प्राणी नष्ट होईल. या धूमकेतूमुळे जगाचा विनाश होईल. यामुळे सर्वकाही संपेल, असं रियाज अहमद गौहर शाही यांनी सांगितलं आहे.
ब्रिटनच्या 'डेली मेल'मधील एका वृत्तानुसार, जगाचा अंत हा ईश्वराचा प्रकोप आहे. २००० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात शाही यांनी म्हटलं आहे की, धूमकेतूमुळे पृथ्वीचा विनाश होईल. येत्या २०२०-२०२५ वर्षांत जगाचा अंत होईल. धूमकेतूच्या धडकेमुळे भूकंप होईल. समुद्राची उंच लाट उसळेल. अनेक शहरे समुद्राच्या लाटेत बुडून जातील. यामुळे संपूर्ण जग नष्ट होईल'.
पाकिस्तानच्या रावळपिंडीत राहणारे रियाज अहमद गौहर शाही यांनी २००१ साली लंडनमधून अचानक बेपत्ता झालेत. त्यांच्या अनुयायांचं म्हणणं आहे की,त्यांचा मृत्यू झालेला नाही. त्यांनी लोकांमध्ये वावरणे बंद केलं आहे. ते जगाचा कधी अंत होईल, या क्षणाची वाट पाहत आहेत'. त्यांचे अनुयायी त्यांना ईश्वराचा अवतार मानतात.
नासा आणि इतर अंतराळ संस्थांनी २०२६ आधी पृथ्वीला कोणताही मोठा धूमकेतू धडकणार नसल्याचं सांगितलं आहे. पृथ्वीला लघुग्रहाचा कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, गेल्या काही दशकांपासून हा धूमकेतू किंवा लघूग्रह पृथ्वीजवळ येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.