India Heat Wave Yandex
देश विदेश

Heat Wave in India: हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप, बिहारमध्ये तीन दिवसात ४४ जणांचा मृत्यू; झारखंड, राजस्थानमध्येही उष्माघाताचे बळी

Deaths due to extreme heat: बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा कडाका पाहायला मिळत आहे. मागच्या 3 दिवसात बिहारमध्ये उष्माघाताने 44 जणांचा मृत्यू झाला असून झारखंड, राजस्थान, ओडिसामधेही उष्माघाताचे बळी ठरलेत.

Gangappa Pujari

गेल्या काही दिवसांपासून देशभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात वाढत असलेल्या उष्णतेचा सर्वात जास्त फटका बिहार राज्याला बसत असून उन्हामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागच्या 3 दिवसात बिहारमध्ये उष्माघाताने 44 जणांचा मृत्यू झाला असून झारखंड, राजस्थान, ओडिसामधेही उष्माघाताचे बळी ठरलेत.

उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका हा बिहार राज्याला बसल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये उष्माघाताने आत्तापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण आजारी पडलेत. वाढत्या उन्हामुळे उत्तर भारतातील 8 राज्यांना रेड अलर्ट जारी केलेला असून तापमान कालही 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळाले.

बिहारप्रमाणे झारखंड, राजस्थान, ओडिसामधेही उष्माघाताने अनेकांचे बळी गेलेत. झारखंडमध्येही उष्माघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच राजस्थानमध्ये गेल्या सात दिवसांत तिघांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यत ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वाढत्या उन्हामुळे बिहारमध्ये शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत बिहारच्या अनेक भागात उन्हाचा कडाका कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. औरंगाबाद (46.1 अंश सेल्सिअस), देहरी (46 अंश सेल्सिअस), गया (45.2 अंश सेल्सिअस), अरवाल (44.8 अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (44.1 अंश सेल्सिअस) या ठिकाणी 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पाटणा येथे कमाल तापमान 40.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT