Explosion Saam Tv
देश विदेश

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू

उत्तर प्रदेशामध्ये एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशामध्ये (Uttar Pradesh) एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट (Explosion) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक कामगारांचा (Workers) मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, मृतदेहांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींने यावेळी सांगितले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, शामली (Shamli) येथील बुटराडा गावातील (village) कारखान्यामध्ये सोमवारी हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की त्यामुळे आजूबाजूचा परिसर संपूर्ण हादरला आहे. यानंतर परिसरामधील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. ग्रामस्थांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांची (firecrackers) निर्मिती सुरु असताना कारखान्यात स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. पण याची नेमकी संख्या आजून देखील समोर आली नाही. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये कामगारांच्या मृतदेहाचे अक्षरशः चिंधड्या उडाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT