इराणची राजकीय व्यवस्था मजबूत असल्याने अचानक सत्तांतर झाले नाही.
मध्यपूर्वेत या घटनेमुळे तणाव वाढण्याची शक्यता.
अयातुल्ला अली खमेनेई यांच्या मृत्यूनंतरही इराणमध्ये सत्ता बदल झाला नाही.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करत २८ फेब्रुवारी रोजी देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांची हत्या केली. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर, इराणने त्यांचा मुलगा मोज्तबा खमेनेई यांच्याकडे सत्ता सोपवली. त्यांना इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवडण्यात आले. सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच, मोज्तबा खामेनेई यांनी आपल्या भाषणातून शत्रूंना इशारा दिला.
दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठी विध्वंस झाला आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनीही इराणमधील सत्ता उलथवून टाकण्यासाठी आणि त्याच्या अणूप्रकल्प नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवत हल्ले चालू ठेवले आहेत. अशा प्रश्न पडतो, सत्तांतर करण्याच्या उद्देशाने अमेरिकेनं इराणच्या सर्वोच्च नेत्याला मारलं, तरीही तेथे सत्ता बदल का झाला नाही? इस्त्रायल आणि अमेरिका इराणमध्ये अयपशी ठरले पराभूत कसे झाले हे जाणून घेऊ.
हल्ल्यापूर्वी अमेरिकेने इराणी नागरिकांना त्यांचे सरकार उलथवून टाकण्याचा इशारा दिला होता. परंतु ते अद्याप यशस्वी झालेल नाहीते. कारण इराणची व्यवस्था सर्व परिस्थितीत टिकून राहण्यासाठी बनवण्यात आली आहे आणि ती सहजपणे उलथून टाकता येत नाही.
इराण नेहमीच युद्ध स्थितीला सामोरे जाऊ शकतो, दोन हात करू शकेल इतका सक्षम देश आहे. युद्ध असो की देशातील विरोधाची लाट सर्वांना व्यवस्थीतपणे तोंड देता येईल. त्यावर मात करता येईल, अशी आपली राजकीय रचना इराणने तयार केली आहे. इराणची संपूर्ण सत्ता रचना एका हायड्रासारखी डिझाइन केलेली आहे. तेथे सत्ता बदलण्यासाठी एका नेत्याचा जीव घेतला तर अनेक नवीन नेते तेथे तयार होतात आणि सत्ता हस्तांतरित होत राहते. म्हणूनच सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूनंतरही तेथे काहीही बदलले नाही.
इराणमध्ये हुकूमशाहीपेक्षा बहुस्तरीय हुकूमशाही आहे जी अनेक स्तरांमध्ये कार्यरत आहे. यात राजकीय इस्लामचे समर्थक आणि कट्टरपंथी इराणी राष्ट्रवाद यांची मजबूत युती आहे. धार्मिक संस्था, सशस्त्र दल आणि अर्थव्यवस्थेच्या मोठ्या भागांसह अनेक केंद्रांमध्ये सत्ता विभागली गेली आहे. यामुळे सत्ता बदलणे खूपच कठीण आहे.
इराणमध्ये संस्था संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहेत आणि सुरक्षा दलांना त्यांची ताकद मानले जाते. इराणमध्ये इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स लष्करासोबत काम करते. बहुतेकदा त्यांना व्यवस्थेचा कणा म्हटलं जातं. लष्करी भूमिकेव्यतिरिक्त इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स एक राजकीय आणि आर्थिक शक्ती देखील बनली आहे. यासह इराणचे सुरक्षा दल एकसंध राहिले आहेत आणि त्यांना तोडणे कठीण आहे.
इराणचे उपसंरक्षण मंत्री रेझा तलैनिक यांनी एका टीव्ही मुलाखतीत म्हटले आहे की, प्रत्येक आयआरजीसी कमांडरकडे तीन स्तरांवर एक उत्तराधिकारी असतो. जेणेकरून ही प्रणाली नेहमी कार्यरत राहील. राज्य-संलग्न संघटना इराणच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग नियंत्रित करतात. आयआरजीसीचे व्यावसायिक साम्राज्य आहे यात खातम अल-अंबिया समूहाचा समावेश आहे, देशाच्या व्यवसाय "संरक्षण" प्रणालीला बळकटी देत असते.
इराणमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यात धर्माचीही महत्त्वाची भूमिका आहे. दुसरे म्हणजे, ऐतिहासिकदृष्ट्या इराणमधील विरोधी पक्ष विभागला गेला आहे आणि त्यांची ताकद सरकार बदलण्यासाठी पुरेशी नाहीये. इराणची पाळत ठेवण्याची व्यवस्था ही या प्रदेशातील सर्वात प्रगत प्रणालींपैकी एक आहे. यात वारंवार इंटरनेट बंद पडणे आणि नियंत्रण राखणारी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित पाळत ठेवणे समाविष्ट आहे. दुसरे कारण म्हणजे, अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हस्तक्षेपाचे परिणाम पाहिले असल्याने, इराणी लोक राजवट बदलाची मागणी करण्यास घाबरतात.
अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात अयातुल्ला अली खेमेनेई यांचा मृत्यू हा सध्याच्या राजवटीसाठी एक मोठा धक्का आहे. कारण इराणला त्यांच्यासारखा दुसरा सर्वोच्च नेता कधीच मिळणार नाही. परंतु इराणवर हल्ला करणाऱ्या देशांनाही हे माहित आहे की या इस्लामिक रिपब्लिकचा पतन होणं सहज शक्य नाही.
यूएस नॅशनल इंटेलिजेंस कौन्सिल (एनआयसी) च्या फेब्रुवारी २०२६ च्या अहवालानुसार, "मर्यादित हवाई हल्ले असतील किंवा मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळ चालणारी लष्करी मोहीम जरी अमेरिकेनं केली. तरी इराणमध्ये नवीन सरकार सत्तेत येण्याची शक्यता कमी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.