Explainer Saam Digital
देश विदेश

Explainer : भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सत्ता अन् तुरुंगवास, कसा आहे आपचा १२ वर्षांचा प्रवास? वाचा सविस्तर

Aam Aadmi Party/Arvind Kejriwal : भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म झालेला आम आदमी पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकला आहे. गेल्या १२ वर्षांत या पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही मिळवला आहे.

Sandeep Gawade

अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून भारताच्या राजकारणात उदयाला झालेली आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल आज स्वतःच भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकले आहेत. केजरीवाल यांना १५६ दिवस तुरुंगात रहावं लागलं आहे. दोन दिवसांपूर्वी जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि आप जवळपास १२ वर्षांपूर्वी जिथे होती तिथे पुन्हा येऊन थडकल्याची चर्चा सुरू आहे. आंदोलनातून जन्मलेल्या आपचा आणि अरविंद केजरीवाल यांचा कसा होता आजपर्यंतचा प्रवास, पुन्हा ती प्रतिष्ठा मिळवणार का? पाहूयात एक रिपोर्ट

अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा करताना आपण जनतेत जावून पाठिंबा मिळवणार आहे. जनतेने कौल दिला तरच मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर बसणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा राजकीय प्रवास 2011 साली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनातून सुरू झाला. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या या देशव्यापी आंदोलनात देशाच्या कानापोपऱ्यातून लोक सहभागी झाले होते. अण्णा हजारे यंच्यानंतर केजरीवाल या आंदोलनाचे प्रमुख चेहरा बनले होते. भ्रष्टाचाराविरोधी जन लोकपाल विधेयक आणण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र राजकीय पातळीवर फारसा फरक पडला नव्हता. यामुळे केजरीवाल यांनी 2 ऑक्टोबर 2012 रोजी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आणि 26 नोव्हेंबर 2012 रोजी 'आम आदमी पार्टी'स्थापना करण्यात आली.

आपचा पहिला विजय आणि सत्ता स्थापन

2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने सर्व 70 जागांवर लढण्याची घोषणा केली आणि 28 जागांवर विजय मिळवून रजकीय पक्षांना धक्का दिला. दिल्लीतील तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना अरविंद केजरीवाल यांनी विक्रमी मताधिक्याने पराभूत केलं. मात्र बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करावी लागली आणि केजरीवाल मुख्यमंत्री झाले. पण हे सरकार केवळ 49 दिवस टिकलं आणि केजरीवाल यांनी राजीनामा दिला.

2015 मध्ये ऐतिहासिक विजय

केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं . 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवून दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन केली. हा विजय केवळ राजकीय नव्हे, तर एक सामाजिक क्रांती म्हणूनही पाहिला गेला. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला मोफत वीज, पाणी, आणि उत्तम शिक्षण सुविधा दिल्या, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. देशातच नाही तर यूनेस्कोनेही त्यांच्या कामाची दखल घेतली.

पक्षांतर्गत संघर्ष

आंदोलनातून सत्तेत आल्यानंतर आपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या संस्थापक सदस्यांनी केजरीवाल यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. केजरीवाल पक्षाचा 'सर्वोच्च नेता' बनण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यामुळे पक्षाने त्यांच्यासह इतर काही प्रमुख नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. यामुळे पक्षात काही काळ ताण निर्माण झाला होता. परंतु केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत राहिला.

2020 मध्ये पुन्हा एकहाती सत्ता

मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतरही केजरीवाल यांची प्रतिमा कायम राहिली. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा 62 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत आपने दिल्लीतील लोकांना दिलेली सेवा, जसे की मोफत वीज, पाणी, आणि उत्तम शिक्षण यामुळे त्यांना प्रचंड जनाधार मिळाला.

पंजाबमध्ये सत्ता आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

दिल्लीतील यशानंतर आपने आता देशात पाय पसरायला सुरुवात केली होती. २०२२ च्या पंजाब विधानसभेत ९२ जागांवर विजय मिळवत बहुमतासह सरकार स्थापन केलं होतं. पंजाबचे भगवंत मान मुख्यमंत्री झाले. या विजयामुळे पक्षाला राष्ट्रीय ओळख मिळाली.दोन वर्षांपूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 13 टक्के मते मिळवून पाच जागांवर विजय मिळवला. यामुळे पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कोणत्याही पक्षाला किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळण्याची गरज असते आणि दिल्ली, पंजाब, गोवा, आणि गुजरातमध्ये आपने हा दर्जा मिळवला.

संसद आणि एमसीडीमध्येही यश

आज आम आदमी पार्टीकडे दिल्ली आणि पंजाबमध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आहे. दिल्लीच्या एमसीडीमध्येही आपचं वर्चस्व आहे. राज्यसभेत 10 आणि लोकसभेत 3 अशा एकूण 13 खासदारांसह आप देशातील चौथ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.आम आदमी पार्टीने आपल्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यापासून सुरुवात करून फक्त 12 वर्षांत एक राष्ट्रीय पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांची 'मोफत' योजनांवर आधारित राजकीय रणनीती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामगिरी, तसेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वामुळे हा पक्ष भारतातील राजकारणात एक महत्त्वाचा घटक बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT