देश विदेश

'EVM हॅकींग शक्य'; विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष, पुन्हा वाद होण्याची शक्यता

EVM Hack : ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवता येऊ शकतो, असा दावा अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी केलाय.

Tanmay Tillu

EVM खरंच हॅक होऊ शकतं का? असं आम्ही विचारण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवता येऊ शकतो, असा दावा केला आहे. यानंतर evm संदर्भात पुन्हा एकदा मोठा संभ्रम निर्माण झालाय. या दाव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये EVM च्या मुद्दयावरुन पुन्हा वाद रंगण्याची चिन्ह नाकारता येत नाहीत

लोकसभा,विधानसभा निवडणुका असोत वा अगदी पालिकेच्या निवडणुका असोत. निकालानंतर देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होतोच. मात्र अशातच ईव्हीएम हॅक करता येतं आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो, याचे पुरावे हाती लागले आहेत, असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गब्बार्ड यांनी केलाय..त्यामुळे भारतात काँग्रेससह विरोधकांच्या आरोपांना पुन्हा धार चढलीये.

ईव्हीएमवर टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनीही आक्षेप घेतला होता. तर गब्बार्ड यांनीही मतदारांना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.त्यामुळे भारतातील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जातेय..यावर निवडणुक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय.

विरोधकांचे आरोप,निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

भारतातील ईव्हीएम इतर देशांपेक्षा वेगळे

आतापर्यंत 5 कोटी VVPATची तपासणी

अमेरिकेप्रमाणे भारताच्या ईव्हीएममध्ये ऑपरेटिंग सिस्टम नाही

भारतीय ईव्हीएम पूर्णपणे ऑफलाइन,अमेरिकन मशीन्स इंटरनेटशी जोडलेल्या

भारतीय ईव्हीएम प्रोग्राम केल्यानंतर बदल अशक्य, अमेरिकन यंत्रात बदल शक्य

भारतात ईव्हीएम बटण दाबल्यानंतर,VVPAT स्लिप, अमेरिकन यंत्रात हे घडत नाही

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने ईव्हीएमची पोलखोल केलीये...मात्र निवडणूक आयोगानं भारतीय ईव्हीएम वेगळं असल्याचं ठासून सांगितलंय..अमेरिकेतील या वादानं भारतात पुन्हा ईव्हीएमची चर्चा सुरु झालीये. तर विरोधकांनाही आयतं कोलीत मिळाल्यानं त्यांच्या विरोधाला वेगळी धार चढलीये. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मुद्दा गाजणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

SCROLL FOR NEXT